Bad Breath : सतत येणाऱ्या तोंडाच्या दुर्गंधीमुळे वैतागले आहात ? या पदार्थांचे करा सेवन, दुर्गंधी होईल नाहीशी !

तोंडाची दुर्गंधी कशी घालवाल ?
Bad Breath
Bad Breath Saam Tv

Bad Breath : झोपेतून उठल्यानंतर किंवा कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यानंतर आपल्या तोंडाचा सतत वास येतो. यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो.

तोंडात साचलेल्या जंतांमुळे आपल्या दात दुखी किंवा तोंडाच्या इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते. ही दुर्गंधी आपल्याला सामान्य वाटत असली तरी, ती स्वच्छतेच्या अभावामुळे किंवा तोंडाच्या इतर दीर्घ आजारांच्या लक्षणांमुळे असू शकते.

लसूण आणि कांदे यांसारख्या अन्नामध्ये दुर्गंधीयुक्त तेले रक्ताद्वारे वाहून जातात. ते तेल फुफ्फुसात पोहोचतात. आहारात काही पदार्थ असे असतात ज्याचा आपल्याला या दुर्गंधीशी लढण्यासाठी मदत करतात. त्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

१. ग्रीन टी -

Green Tea
Green TeaCanva

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा अँटिऑक्सिडेंट असतो. जो श्वासोच्छवासास कारणीभूत असलेल्या सल्फर संयुगे कमी करून तोंडातील जीवाणूंना रोखण्यास मदत करु शकतो.

२. लिंबूवर्गीय फळे -

Fruits
FruitsCanva

या फळांमध्ये जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते जे केवळ बॅक्टेरियांना नियंत्रणात ठेवण्यासाठीच नाही तर हिरड्यांचे आजार आणि हिरड्यांना आलेली सूज यांच्याशी लढण्यास मदत करते.

Bad Breath
Monsoon Care Tips : तुमच्या नखांमध्ये घाण साचते? नखांजवळ मृत त्वचा निर्माण होते ? पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या

३. दही -

Yogart
YogartCanva

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते. ते दुर्गंधीयुक्त जीवाणूंवर मात करू शकतात. त्यात जीवनसत्तव (Vitamins) ड देखील भरपूर आहे, ज्यामुळे शरीरातील जंतूंचा विकास कमी होतो.

४. तुळशी -

Tulsi
TulsiCanva

तुळशीतील पॉलीफेनॉल नावाचे नैसर्गिक रेणू श्वासाच्या दुर्गंधीवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत, असे संशोधनातून समोर आले आहे. तुळस भारतीय घरांमध्ये सहज सापडते.

५. आले -

Ginger
GingerCanva

आल्यामध्ये आढळणारे घटक हे लाळेचे एंझाइम सक्रिय करते जे तोंडातील सल्फर संयुगे विघटन करण्यास मदत करते. माउथवॉशसाठी आपण आले ठेचून कोमट पाण्यात (Water) आणि लिंबूसोबत घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com