व्यक्तीच्या आयुष्यात वाढतं वजन आणि लठ्ठपणाच मोठं संकट उभं राहिलं आहे. लठ्ठ व्यक्ती कधी व्यायाम तर कधी योगाचा सहारा घेताना दिसतात. एवढं करून सुद्धा त्यांच वजन किंचितही कमी होताना दिसत नाही. बऱ्याच लठ्ठ लोकांना माहिती आहे की, यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं. जर तुमचही वेळे आधी वजन वाढलं असेल आणि तुम्ही लठ्ठ होण्याच्या मार्गावर असाल तर वजन कमी करण्यासाठी नागपूरचे तज्ञ डॉक्टर संकेत पेंडसे यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
सकाळी उठल्यावर किमान 30 मिनिटे चालले पाहिजे आणि 30 मिनिटं तरी व्यायाम नियमित केला पाहिजे.
ऑफिसमध्ये असताना एका जागेवर सलग 3-4 तास बसू नये मध्ये-मध्ये पाणी पिण्यासाठी उठलं पाहिजे.
जंक फूड, बंद पाकीट मध्ये असणारे पदार्थ खाऊ नये.
सकाळी नाश्ता केला पाहिजे. त्यामध्ये पोहे, उपमा, मिसळ असेल तर त्यासोबत शेव असावी.
दुपारी आणि रात्रीच्या जेवणात संतुलित आहार असावा. त्यामध्ये पोळी-भाजीसोबत सॅलड , दही, वरण, ताक हे सुध्दा असायला हवेत.
सर्वात मुख्य बेकरीतले कुठलेही प्रॉडक्ट जसं की खारी, टोस्ट, बटर, पाव, बिस्कीट खाऊ नये.
आहार तज्ञ इशिका गुप्तानी काय दिला सल्ला ?
इशिका गुप्ताने तिच्या Instagram वर एक व्हिडिओ टाकला आहे. इशिकाने व्हिडिओमध्ये जलद गतीने वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहे. चला तर मग बघुयात काय आहेत टिप्स.
वजन कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाय
खाण्यात कॅलरीजचं प्रमाण कमी केलं पाहिजे
वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचऺ प्रमाण कमी करण्याचे सल्ले दिले जातात. तुम्ही तुमच्या खाण्यात कॅलरीजवाले पदार्थ कमी केले पाहिजेत. कमी कॅलरीज खाण्यात वापरल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
तुमच्या जेवणात २० ग्राम तरी प्रोटीन असलं पाहिजे.
वजन कमी व्हावं यासाठी अनेक जण प्रयत्न करतात तेव्हा जेवणात २० ग्राम तरी प्रोटीन असलं पाहिजे. लक्षात ठेवा वजन कमी करण्याच्या नादात पेशींवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
दैनंदिन कामे टाळू नका
वजन कमी करण्याचा प्रवासात आपले दैनंदिन कामात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. काम करत असताना शरीराचा व्यायाम होत असेल तर होऊ द्या. उदा. फोनवर बोलता बोलता चालत असाल, महिला घराची फारशी स्वच्छ करत असतील, डान्स करणं किंवा घरात पाळीव प्राणी असतील तर त्याच्यासोबत खेळा. योग आणि स्विमिंग या सर्व घटनांचा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे.
पुरेशी झोप
आपण किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. कारण वजन कमी होण्यामागे झोपेचा थेट संबंध असतो. हल्ली रील्सचे फॅड आलं आहे. लहानांपासून - मोठ्यांपर्यंत सगळेच वेळ-काळ बघत नाहीत आणि रात्रभर जागरण करत बसतात तसऺ करू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. झोप कमी झाल्यामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढू लागतात. त्यामुळे भूक वाढते आणि व्यक्ती सारखं खात राहते आणि वजन वाढते. झोप चांगली झाली तर पचनशक्ती चांगली राहते आणि भूकही कमी लागते.
रोज सकाळी जास्तीत जास्त चाललं पाहिजे
रोज सकाळी उठून चाललं पाहिजे. असा म्हणतात चालले तर चालले. चालल्यानेही वजन कमी करण्यासाठी मदत होते. रोज थोडं -थोडं चालत चालण्याची क्षमता स्वतः साठी वाढवली पाहिजे. यासाठी फिटनेस ट्रेकरची मदत घ्यावी.
जास्तीत-जास्त पाण्याचं सेवन केलं पाहिजे.
पाणी हे जीवन आहे. पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरात संतुलन राहते. तसेच भूक शांत होते. कॅलरी बर्न सुद्धा होतात. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी ८ ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी वर सांगितलेल्या गोष्टीचं पालन करा. बाहेरचे कोणतेही जंक फूड, फास्ट फूड खाऊ नका. लवकर झोपा, लवकर उठा किमान ८ तास तरी झोप होईल याची काळजी घ्या. चांगलऺ आयुष्य जगा आनंदी राहा निरोगी राहा. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार करा. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.