Hair Loss: ४०% रुग्णांमध्ये केसगळतीचं मुख्य कारण थायरॉईड; जाणून घ्या उपचाराची योग्य पद्धत

thyroid hair loss treatment: केस गळतीची समस्या असलेल्या सुमारे ४०% रुग्णांमध्ये थायरॉईड हा मुख्य कारण असतो. थायरॉईड ग्रंथीतील असंतुलनामुळे शरीरातील हार्मोन्स बदलतात आणि त्याचा थेट परिणाम केसांवर होतो.
Hair Loss After chemotherapy
Hair Loss After chemotherapy Saam Tv
Published On

आजकाल पुरुष आणि स्त्रियांमध्ये केस गळती ही खूप मोठ्या प्रमाणावर दिसणारी समस्या झाली आहे. ही इतकी सामान्य झाली आहे की अनेकांना यामुळे मानसिक ताण येतो आणि आत्मविश्वास कमी होतो. लोक बहुतेक वेळा प्रदूषण, चुकीचा आहार किंवा कामाचा ताण याला कारण मानतात, पण थायरॉईडचे असंतुलन हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण ठरते.

हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम या दोन्ही स्थितींमुळे केसांच्या वाढीचा नैसर्गिक क्रम बिघडतो आणि हळूहळू केस पातळ होऊ लागतात. त्यामुळे दीर्घकालीन समस्या टाळण्यासाठी वेळेवर थायरॉईड तपासणी करणं गरजेचं आहे.

Hair Loss After chemotherapy
Lifestyle Changes: चांगल्या प्रजनन आरोग्यासाठी जीवनशैलीतील बदल गरजेचे, महिलांनी 'या' गोष्टी कराव्या फॉलो, तज्ज्ञांचा सल्ला

मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे सांगतात की, केस गळतीची तक्रार घेऊन अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र थायरॉईडमुळेही केस गळू शकतात. हे अनेकांना माहिती नसतं. थायरॉईड हार्मोन शरीरातील अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. त्यात केसांच्या मुळांची वाढही येते.

ज्यावेळी हे हार्मोन असंतुलित होतात तेव्हा केसांची मुळं कमकुवत होतात, केस गळतात आणि वाढ मंदावते. आहार आणि जीवनशैली योग्य असली तरीही ही समस्या कायम राहू शकते. केस गळण्याबरोबरच थकवा, वजनात बदल, कोरडी त्वचा किंवा छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसतात, जी थायरॉईडच्या समस्येचे संकेत असतात, असं डॉ. चौसे यांनी सांगितलं.

Hair Loss After chemotherapy
Lifestyle Changes: चांगल्या प्रजनन आरोग्यासाठी जीवनशैलीतील बदल गरजेचे, महिलांनी 'या' गोष्टी कराव्या फॉलो, तज्ज्ञांचा सल्ला

थायरॉईड तपासणी न केल्याने अनेकदा केसगळतीचं खरं कारण लक्षात येत नाही. २४ ते ३७ वयोगटातील अनेक रुग्ण केस गळण्याच्या तक्रारी घेऊन येतात, पण त्यांना थायरॉईडची समस्या आहे हे माहित नसते. तपासणीचा सल्ला दिल्यावरच त्यांना कळतं की, केस गळतीचं मूळ कारण थायरॉईड आहे. नियमित तपासणीमुळे हे असंतुलन लवकर ओळखता येतं आणि योग्य उपचार करून केसांची वाढ पुन्हा सामान्य करता येते.

अपोलो निदान केंद्र मुंबईच्या विभागीय तांत्रिक प्रमुख डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितलं की, केस गळणं हे थायरॉईडच्या असंतुलनाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं जे गंभीर लक्षणं दिसेपर्यंत दुर्लक्षित राहते. टिएसएच, टी३, टी४ आणि थायरॉईड प्रतिपिंड तपासणीसारख्या चाचण्या निदानासाठी उपयुक्त ठरतात. निदान झाल्यावर औषधं, जीवनशैलीतील बदल आणि पूरक आहाराने थायरॉईड नियंत्रित करता येतो, ज्यामुळे केस गळती कमी होते. सतत केस गळण्याची समस्या असेल तर या चाचण्या वेळेवर करणं महत्त्वाचे आहे.

Hair Loss After chemotherapy
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

ही तपासणी सोपी आहे आणि भविष्यातील गुंतागुंत टाळली जाते. थायरॉईड नियंत्रणासाठी आयोडीन, प्रोटीन, लोह असलेला संतुलित आहार घ्या. योग, ध्यान किंवा व्यायामाने तणाव कमी करा. निदान झाल्यास औषधं नियमित घ्या आणि वेळोवेळी तपासणी करा. थायरॉईड तपासणीमुळे वेळेवर निदान होऊन योग्य उपचार करता येतात, ज्यामुळे केस गळती थांबते आणि केसांचे आरोग्य टिकून राहते.

Hair Loss After chemotherapy
Colon cancer: त्वचेवर दिसणारे हे संकेत दर्शवतात कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा चेहऱ्यावर दिसणारे बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com