Pitru Paksha 2024 : यंदाचा पितृ पक्ष शुभ की अशुभ? ब्रह्मांडात घडणार २ मोठ्या घटना

Pitru Paksha 2024 Shradh : यंदाचा पितृ पक्ष अशुभ का मानला जात आहे? या बद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Pitru Paksha 2024 Shradh
Pitru Paksha 2024Saam TV
Published On

पितृ पक्षातील श्राद्ध १७ सप्टेंबरपासून सुरु होणार असून १८ सप्टेंबरला पहिले श्राध्द केले जाणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून यंदाचा पितृ पक्ष शुभ नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आज यामागचं कराण काय? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

दरवर्षीप्रमाने पितृ पक्ष श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेपासून सुरु होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत संपतो. हिंदू धर्मात पितृ पक्षाला फार महत्तव आहे. पितृ पक्ष तिथी पितरांच्या आत्म शांतीसाठी केली जाते. या दिवशी पितरांसाठी श्राध्द, विधी, पिडंदानही केले जात असते. पितृ पक्षाचे किंवा श्राद्धा पक्षाचे हे सोळा दिवस फार महत्वाचे असतात.

या तिथीला आपल्या पूर्वजांना बोलवून त्यांच्या आवडीचे जेवण तयार केले जाते. या वर्षी २०२४चा पितृ पक्ष १७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण पहिले श्राध्द १८ सप्टेंबरला घरोघरी केले जाणार आहे.

Pitru Paksha 2024 Shradh
Sangli News: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपची एन्ट्री; स्वबळाचा नारा देत उमेदवारी केली जाहीर

पितृ पक्षात असे मानले जाते की या पक्षात आपले मृत पूर्वज पृथ्वीवर येतात. या तिथीत पूर्वजांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपण केलेल्या चुकांना माफ करतात.

या श्राध्दाच्या दिवशी अन्नदान करण्याची सुद्धा परंपरा आहे. कोणाला पितृ दोष असेल तर त्यासाठी हे श्राध्द केले जाते. पण यंदाचा हा पितृ पक्ष शुभ नाही. कारण या पितृ पक्षात ग्रहण असणार आहे. हे ग्रहण पितृ पक्षाच्या सुरुवातीला आणि संपण्याच्यावेळी देखील असणार आहे.

ब्रह्मांडात घडणारी पहिली घटना

या वर्षातील दुसरे चंद्रगहण पितृ पक्ष असलेल्या १८ सप्टेंबरलाच आहे. जर २ ऑक्टोबरला या पितृ पक्षाचा शेवटचा दिलस आणि सूर्यग्रहण सुद्धा आहे. भाद्रपद पौर्णिमेला असलेले चंद्रग्रहण आणि शेवटचे हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नाही. ही दोन्ही ग्रहणं त्या दिवशी अदृश्य राहणार आहेत.

या कारणांमुळे हिंदू धर्मात ग्रहणाच्या काळाला अशुभ मानले जाते. एकाच वेळी १५ दिवसांच्या अंतराने जेव्हा दोन्ही ग्रहण एकत्र येत असतात तेव्हा ही घटना फार अशुभ मानतात. या काळात पितृ पक्षाच्या पूजा, विधीची खूप काळजी घेतली जाते. या दिवशी पितृ पक्षाचा मोक्षकाळ संपल्यावर प्रतिपदा श्राध्द सुरु करायचे असते. त्यानंतर शेवटच्या दिवशी पितृ पक्षाचा विधी संपन्न करायचा असतो. त्यामुळे शेवटच्या सूर्यग्रहणाला म्हणजेच पितृ पक्षाला कोणताही परिणाम निर्माण होत नाही.

Pitru Paksha 2024 Shradh
Budh-Shukra Gochar: पितृ पक्षात होणार बुध-शुक्राचं गोचर; व्यापारातून 'या' राशींना मिळणार भरपूर पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com