Relationship With Female Friends
Worst Female FriendsSaam TV

Worst Female Friends : 'या' तीन स्वभावाच्या मैत्रिणी तुमच्या लग्नासाठी आहेत घातक; वाचा आणि सावध व्हा

Relationship With Female Friends : काही मौत्रिणी खरोखर आपली मदत करतात. मात्र काही मैत्रिणी तशा नसतात. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी समजल्यावर त्या आपल्यावर सापाप्रमाणे पलटवार करतात.
Published on

आपल्या आयुष्यात एखादी चांगली मैत्रिण आली की आपल्याला तिला सर्व सुख आणि दु:ख सांगावं वाटतं. तिच्याजवळ मन मोकळं केली की ती आपल्याला आधार देईल आणि आलेल्या समस्येला सामोरं कसं जायचं याची माहिती सांगेल असं आपल्याला वाटतं. काही मौत्रिणी खरोखर आपली मदत करतात. मात्र काही मैत्रिणी तशा नसतात. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी समजल्यावर त्या आपल्यावर सापाप्रमाणे पलटवार करतात. त्यामुळे अशा स्वभावाच्या मैत्रिणींपासून सावध राहिलं पाहिजे.

Relationship With Female Friends
Abhishek Malik And Friend Three men Assault: प्रसिद्ध अभिनेत्यासह मैत्रिणीवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, अभिनेता जखमी

अशा मुली तुमच्या आयुष्यात तुमचे वैवाहिक जीवण आणखी खराब करू शकतात. त्यांना आजच तुमच्या जीवनातून दूर करा. तसेच काही कारणास्तव त्यांनी पुन्हा तुम्हाला भेटण्याचा आणि तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात एन्ट्री करू देऊ नका. त्याने तुमचे जास्त प्रमाणात मानसिक नुकसान होईल. तर आता अशा मैत्रिणी कशा ओळखायच्या त्याचीच काही उदाहरणे पाहणार आहोत.

कपटी

काही मैत्रिणी मनाने फार कपटी असतात. त्या तुमच्या समस्या ऐकून तुम्हाला त्या वेळी आधार देतात. मात्र नंतर तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगतात. तुमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी सुरू असतील तर त्या त्यावर सतत वाईट विचार तुमच्या मनात भरवून देतात. अशा मैत्रिणी तुमच्या मॅरीड लाईफसाठी घातक ठरतात.

स्वार्थी

काही मैत्रिणी फार स्वार्थी असतात. त्यांना तुमच्या आयुष्यात संकट आले की त्यावर त्यांना आनंद होतो. अशा मैत्रिणी काही ना काही कारणे सांगूत तुमच्यापासून दूर जातात. किंवा मी एका महत्वाच्या कामात व्यस्त असल्याचं खोटं नाटक करतात. स्वार्थी मैत्रिणी तुमच्या जवळ असलेल्या सर्व वस्तूंचा फायदा करून घेतात. मात्र तुम्हाला गरज पडली की या मैत्रिणी थेट आपले हात वर करतात आणि निघून जातात.

कुटुंबाबद्दल मनात द्वेष निर्माण करणे

एखाद्या मैत्रिणीचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरू असेल तेव्हा वाईट स्वभावाच्या मैत्रिणींना ते आवडत नाही. त्यामुळे पती किंवा सासू सासऱ्यांबद्दल त्या तुम्हाला भडकवू शकतात. तसेच सासू-सासऱ्यांना तुम्हाला त्रास देण्यास भाग पाडतात. पती आपला शत्रू आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण करतात. आता तुमचा मैत्रिणीवर जास्त विश्वास असल्याने तिने कपटी भावनेतून सांगितलेल्या गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे अशा मैत्रिणींमुळे वैवाहिक आयुष्यात वाद वाढतात.

Relationship With Female Friends
Salman Khan Female Fan News : सलमानखानसोबत लग्न करायचा हट्ट, तरुणी दिल्लीवरून थेट पनवेल फार्महाऊसवर पोहोचली; पोलिसांनी केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com