Strong Bones : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेल्या बियांचे सेवन करा; शरीर होईल लोखंडासारखं पोलादी

Calcium For Strong Bones : कॅल्शिम कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर आपण जास्तप्रमाणात दूध पितो. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
Calcium For Strong Bones
Strong BonesSaam TV
Published On

अनेक व्यक्तींना सतत सांधे दुखणे, हाडांचा आवाज येणे, हात पाय दुखणे या समस्या जाणवतात. अगदी लहान, तरुण मुला-मुलींना सुद्धा या समस्या असतात. ज्या व्यक्तींची हाडे कमजोर असतात त्यांनाच असा त्रास होतो. हाडे ठिसूळ झाली की ती सहज मोडतात, फॅक्चर होतात. त्यामुळे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. त्याने तुमच्या हाडांना कॅल्शिम मिळते.

Calcium For Strong Bones
Ahmednagar Milk Protest News: दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक आक्रमक; कोल्हार -घोटी मार्ग अडवला!

कॅल्शिम कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर आपण जास्तप्रमाणात दूध पितो. अनेक व्यक्तींचा असा समज आहे की दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. मात्र समज नसून फक्त गैरसमज आहे. केवळ दूधाचे सेवन वाढवल्याने शरीराला हवं तेवढं कॅल्शिअम मिळत नाही. त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याची माहिती या बातमीमधून जाणून घेऊ.

दही

एक कप दही घेतल्यास त्यात ४८८ मिलीग्राम कॅल्शिअम असते. आपल्या आरोग्यासाठी दही फार चांगले आहे. दूधासारखेच दही देखील समान प्रमाणात कॅल्शिअम प्रोव्हाइड करते. त्यामुळे आहारात फ्रेश, जास्त आंबट नसलेलं दही असणे उत्तम आहे.

बदामचे दूध

फक्त दूध पिण्यापेक्षा बदाम दूध घरीच बनवा. १ कप बदाममध्ये ४४९ मिलीग्राम कॅल्शिअम असते. बदाम मिल्क बनवताना दूधात बदाम भिजत ठेवायचे आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे. याची चव देखील साध्या दूधाच्या तुलनेत जास्त पटीने चविष्ट असते. लहान मुलं देखील हे बादाम दूध मोठ्या आवडीने पितात. बदाम दूध हा कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत आहे.

संत्रा ज्यूस

१ कप संत्रीमध्ये ३४७ मिलिग्राम कॅल्शिअम असते. त्यामुळे जेवताना आहारात संत्र्याचे सेवन करा. त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमीन असते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. तसेच हाडांची दुखणी देखील कमी होतात.

ओट्स

फक्त दूध पिणे अनेकांना आवडत नाही. तुम्हाला देखील फक्त दूध आवडत नसेल तर तुम्ही ओट्ससह हे खाऊ शकता. ओट्स तुम्ही दूधासह असेच सुक्के किंवा चिखट भाजी बनवून खाऊ शकता. तसेच पाण्यात आणि तेलात शिजवून देखील याचे सेवन करता येते.

सोयामिल्क

१ कप फोर्टिफाइड सोयामिल्कमध्ये ३०० मिलीग्राम इतके कॅल्शिअम असते. मात्र गायीच्या दूधामधील कॅल्शिअमच्या तुलनेत यात कमी प्रमाणात कॅल्शिअम असते. यामध्ये कॅल्शिअमसह व्हिटॅमीन डी देखील असतं. तसेच यामध्ये प्रथिने, आयर्न आणि व्हिटॅमीन सुद्धा जास्तप्रमाणात असतं. याने खाडे खरोखर पोलादासारखी होतात.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही, तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

Calcium For Strong Bones
Raju Shetti on Milk Price News : दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com