भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे ( Monsoon) असतात. पावसाळा (Rainy Season) आणि पर्यटनाचे (Tourism) समीकरणही अप्रतिम आहे. पावसाळ्यात सहलीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर भारतातील 10 ठिकाणे ही पावसाळ्यातील सहलीसाठी अप्रतिम मानाली जातात. (These ten places in India are the best option for a trip in the rainy season)
1 माजुली, आसाम : माजुली हे आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. माजुली हे ठिकाणी गेल्या शेकडो वर्षांपासून सांस्कृतिक केंद्र आहे. परंतु आता ते आपले अस्तित्व गमावत चालले आहे. जर तुम्हाला अशा ठिकाणी जायची आवड असेल तर पावसाळ्यात तुम्ही याठिकाणी सहलीला नक्की जाऊ शकता.
2 झिरो, अरुणाचल प्रदेश : खडकाळ दगडांमध्ये राहून पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर अरुणाचल प्रदेशातील झिरो हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जागतिक पर्यटन वारसा मध्ये समाविष्ट असलेले हे शहर अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथील सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळा हा सर्वात उत्तम ऋतु आहे.
3 कोडाईकनाल, तामिळनाडू - तामिळनाडूमधील दिंडीगुलच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले कोडाईकनाल हे एक मनमोहक हिल स्टेशन आहे. आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि सुंदर दृश्ये पावसाळ्यात अधिक आनंददायक बनतात. आपण सहलीला जाण्याच्या विचारात असाल तर कोडाईकनाल हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
4 शुजा, हिमाचल प्रदेश- हिमाचल प्रदेशच्या सेराज खोऱ्यात शोजा नावाचे एक ठिकाण आहे. असे म्हणतात की, पावसाळ्यात इथले वातावरण स्वर्गाप्रमाणे दिसू लागते.
5 मोसिनराम, मेघालय- मेघालयातील या ठिकाणी बराच काळ पाऊस पडतो. म्हणून, इथले नैसर्गिक सौंदर्य इतर सर्व ठिकाणांपेक्षा चांगले आहे.
6 देवरिया, उत्तराखंड- उत्तराखंडमधील मस्तुरा आणि सारी या छोट्या खेड्याजवळील डोंगरावरुन दिसणारे दृश्य खूपच मंत्रमुग्ध करणारे आहे. येथे पावसाळ्यात दिसणारी दृश्ये अतिशय मोहक असतात.
7 शिवसुंदरम, कर्नाटक - जर तुम्हाला पावसाच्या मनमोहन थेंबाचा आनंद घ्यायचा असेल, तर कर्नाटकातील शिवसुंदरम हे ठिकाणही तुम्ही सहलीसाठी निवडू शकता.
8 रानीखेत, उत्तराखंड- उत्तराखंडमधील रानीखेत हे ठिकाणही पावसाळ्यातील सहलीसाठी उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तेथून परत येण्याची इच्छाच होणार नाही.
9 काकाबे, कर्नाटक - पावसाळ्याच्या काळात कर्नाटकचा प्रत्येक कोपरा स्वर्गाप्रमाणे भासतो. कर्नाटकातील काकाबे हे छोटेसे गाव आहे. जर आपण नैसर्गिक सौंदर्याचे चाहते असाल तर पावसाळ्यात याठिकाणी सहलीला नककीह येऊ शकता.
10 ओरछा, मध्य प्रदेश- इतिहासाच्या मुळांशी निगडित ओरछा तुमची पावसाळ्यातली सहल अविस्मरणीय करू शकते. सोळाव्या शतकात बुंदेलचा राजपूत राजा रुद्र प्रताप यांनी ओरछाचा पाया घातला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.