अभिनेता उज्ज्वल धनगरचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’सोबतच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती.
उज्ज्वल धनगरचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
उज्ज्वल धनगरचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनTwitter/@Ujjval Dhangar
Published On

मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी (SwrajyRakshak Sambhaji), स्वराज्यजननी जिजामाता’ (Swarajyjanani JIjamata), क्राइम पेट्रोल (Crime Petrol) सारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता उज्ज्वल धनगर(Ujjwal Dhangar) याचे नुकतेच निधन झाले. हृदयविकाराच्या (Heart attack) तीव्र झटक्याने वयाच्या 29 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट लिहित उज्वलच्या निधनाची माहिती दिली. त्याच्या पश्चात त्याची आई, वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. टिटवाळा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंकार करण्यात आले. (Actor Ujjwal Dhangar dies of heart attack)

उज्ज्वल धनगरचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे सुरू...

ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शहापूर तालुक्यातील (Shahapur Taluka) मूळचा रहिवासी असलेला उज्ज्वल गेल्या 15 वर्षांपासून तो टिटवाळ्यात (Titwala) राहत होता. २००८ पासून तो अभिनय क्षेत्रात होता. त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सोबतच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. तर ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ यासारख्या हिंदी मालिकांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. याशिवाय त्याने अनेक कार्यक्रमाचे निवेदनही केले आहे.

शानिवारी ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर केले. त्यानंतर रविवारी रात्री त्याने नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत जेवणही केले. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास छाती आणि पोटात दुखायला लागल्यामुळे तो महागणपती रुग्णालयात दाखल झाला. सुरवातीला अॅसिडिटीचे औषध घेऊन तो घरी आला, मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला. यावेळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com