Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

Tuesday Remedies In Marathi: जर तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल, कर्जबाजारी झाला असाल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तर मंगळवारी काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.
Mangalwar Upay
Mangalwar Upaysaam tv
Published On
Summary
  • मंगळवार हा हनुमानजीचा पवित्र दिवस आहे.

  • मंगळवारी पूजेने मंगळ दोष दूर होतो.

  • मुक्या प्राण्याला अन्न देणे धनलाभ देते.

हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या पूजेसाठी अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी श्रद्धेने पूजा-अर्चना केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. याचसोबत कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो.

मंगळवारी उपवास आणि उपासना केल्याने हनुमानजींची कृपा तर मिळण्यास मदत होते. मात्र काही खास उपाय केल्यास कर्ज, संकट आणि आजारपणासारख्या त्रासांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मंगळवारचे काही अचूक उपाय.

मंगळ ग्रह बलवान करण्याचा उपाय

हनुमानजींना मंगळ ग्रहाचा अधिपती मानले जाते. जर कुणाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर मंगळवारी हनुमानजींची पूजा आणि उपासना केली पाहिजे. असं केल्याने मंगळ ग्रहाचे दोष नाहीसे होतात आणि मंगळ ग्रह शुभ परिणाम देऊ लागतो.

Mangalwar Upay
Dhanadhya Yog: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीमुळे तयार होणार धनाढ्य योग; 'या' राशींवर होणार सुखाची बरसात, बक्कळ पैसाही मिळणार

आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय

ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांनी मंगळवारी मुक्या प्राण्याला गूळ, हरभरा, केळी, शेंगदाणे यांसारख्या वस्तू खाऊ घालाव्यात. हे उपाय सलग ११ मंगळवार केले तर धनलाभाचे योग निर्माण होतात.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जावं. तिथे तेलाचा दिवा लावावा आणि हनुमानजींच्या मूर्तीसमोर बसून हनुमान चालीसा पठण करावं. यामुळे पैशांची तंगी दूर होते.

कर्जमुक्तीचा उपाय

जर कुणी कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असेल तर मंगळवारी हनुमानजींची मनापासून पूजा करावी आणि उपवास करावा. त्यादिवशी ‘ॐ हनुमते नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. या उपायामुळे कर्जाचा त्रास दूर होतो आणि धन आगमनाचे मार्ग खुलतात.

Mangalwar Upay
Horoscope: होळीपासून 'या' राशींचे येणार अच्छे दिन; गजकेसरी राजयोगामुळे लागणार जॅकपॉट, वाढेल हुदा अन् पैसा

कर्जमुक्तीसाठी आणखी एक उपाय

कर्जमुक्तीसाठी आणखी एक उपाय असा आहे की, मंगळवारी हनुमानजींना बूंदीचा भोग लावावा आणि प्रसाद घरी न नेता मंदिरातच वाटावा. नंतर हनुमानजींना प्रार्थना करावी की कर्जमुक्त होण्यासाठी योग्य मार्ग दाखवा. हा उपाय सलग ५-६ आठवडे केल्यास कर्ज कमी होण्यास मदत होते.

Mangalwar Upay
Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

धनवाढीसाठी उपाय

जर संपत्ती आणि पैशांमध्ये वाढ हवी असेल तर मंगळवारी एक नारळ घ्यावा आणि तो डोक्यावरून सात वेळा फिरवावा. त्यानंतर हा नारळ हनुमान मंदिरात नेऊन भगवानाला अर्पण करावा. या उपायामुळे आर्थिक प्रगतीचे योग जुळतात.

Q

मंगळवारी कोणाची पूजा करणे शुभ मानले जाते?

A

मंगळवारी हनुमानजीची पूजा करणे शुभ मानले जाते.

Q

मंगळ दोष दूर करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर आहे?

A

मंगळवारी हनुमानजींची नियमित पूजा करणे मंगळ दोष दूर करते.

Q

आर्थिक संकट दूर करण्यासाठी काय दान करावे?

A

मुक्या प्राण्याला गूळ, हरभरा, केळी, शेंगदाणे द्यावे.

Q

कर्जमुक्तीसाठी कोणता मंत्र १०८ वेळा जपावा?

A

‘ॐ हनुमते नमः’ हा मंत्र १०८ वेळा जपावा.

Q

धनवाढीसाठी मंगळवारी कोणता उपाय करावा?

A

नारळ डोक्यावरून सात वेळा फिरवून हनुमान मंदिरात अर्पण करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com