आजकाल युरिक अॅसिड वाढणे सामान्य समस्या झाली आहे. यावर वेळेत नियंत्रण न ठेवल्यास संधिवात, किडनी स्टोनसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, चुकीच्या आहारामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढते. त्यामुळे लाल मांस, समुद्री अन्न, अल्कोहोल आणि गोड पेये टाळून, आरोग्यदायी आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून या समस्येपासून बचाव करता येतो.
शरीरात प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनामुळे युरिक अॅसिड तयार होते. प्युरिन हे शरीरातील पेशींमध्ये आणि काही अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. जर प्युरिनचे प्रमाण वाढले आणि ते शरीरातून नीट बाहेर निघाले नाही, तर युरिक अॅसिड जमा होऊन समस्या निर्माण करू शकते. युरिक अॅसिड नियंत्रणासाठी काही पदार्थांचे सेवन कमी करणे किंवा टाळणे आवश्यक आहे, जेणेकरून आरोग्य टिकवता येईल.
लाल मांस प्रथिनांचा चांगला स्रोत असले तरी, जास्त सेवन केल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, जास्त लाल मांस खाणाऱ्या लोकांमध्ये युरिक अॅसिड आणि गाउट होण्याची शक्यता वाढते. तसेच, कोळंबी, ट्यूना आणि मॅकरेल यांसारख्या समुद्री माशांमध्येही प्युरिनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा सेवन मर्यादित करणे गरजेचे आहे. त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा आहे.

या गोष्टी देखील हानिकारक आहेत.
- कोल्ड्रिंक आणि सोडा यासारख्या पेयांमुळे शरीरात प्युरिन वाढतो आणि त्यामुळे युरिक अॅसिड वाढण्याचा धोका वाढतो.
- जामा जर्नलच्या अभ्यासानुसार, फ्रुक्टोजचा जास्त वापर युरिक ऍसिडची पातळी जलद वाढवतो, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येते.
- चिप्स, बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स आणि फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट्स व प्रिझर्वेटिव्ह्स असतात, जे चयापचय बिघडवून युरिक ऍसिड वाढवू शकतात.
- लठ्ठपणा आणि कमी हालचालमुळे शरीरातील युरिक अॅसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया कमी होते, ज्यामुळे समस्या वाढते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.