Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Signs of a toxic relationship: प्रेम आणि नात्यांमध्ये अनेकदा गुंतागुंत असते. काहीवेळा प्रेमसंबंध असे बनतात, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मानसिक किंवा भावनिक त्रास देते, ज्याला आपण 'टॉक्सिक रिलेशनशिप' असे म्हणतो.
Signs of a toxic relationship
Signs of a toxic relationshipsaam tv
Published On
Summary
  • टॉक्सिक नात्यांकडे आकर्षित होणे मनाचा दुबळेपणा नसून मनोवैज्ञानिक कारण असते.

  • भूतकाळातील अनुभव आपल्या सध्याच्या नात्यांवर खोल परिणाम करतात.

  • टॉक्सिक व्यक्ती सुरुवातीला प्रेमाचा वर्षाव करतात, नंतर टीका करू लागतात.

अनेकदा आपण पाहतो की काही व्यक्ती रिलेशनशिपमध्ये टॉक्सिक व्यक्तींकडे आकर्षित होतात. मुळात ही सवय अनेकांना असते आणि त्यातून बाहेर पडणं खूप कठीण वाटतं. अशा नात्यांमध्ये आपण जरी त्रास सहन करत असलो, तरीही ते तोडणं किंवा दूर जाणं खूप कठीण वाटतं. हे वर्तन केवळ मनाचा दुबळेपणा नसून आपल्या मनाच्या खोलवर रुजलेल्या काही मनोवैज्ञानिक कारणांमुळे घडत असतं.

आजच्या या आर्टिकलमधून जाणून घेऊया की, अशा नात्यांमध्ये पुन्हा पुन्हा का अडकतो आपण आणि त्यातून कसं बाहेर पडता येईल.

भूतकाळातील अनुभव

आपल्या भूतकाळातील अनुभव आपल्या सध्याच्या नातेसंबंधांवर खोल परिणाम करतात. जर लहानपणी किंवा किशोरवयात अस्थिर किंवा शारीरिक-भावनिक अपूर्णतेने भरलेलं नातं अनुभवलं असेल तर मोठेपणी अशीच नाती ओळखीची वाटू लागतात. जरी ती अपायकारक असली तरीही ‘माझ्यासाठी प्रेम असंच असतं’ असं मनाला वाटत राहतं.

Signs of a toxic relationship
Toxic Men: महिलांचं टॉक्सिक पुरुषांकडे अधिक आकर्षण का असतं? जाणून घ्या काय आहेत कारणं

वागण्यातील बदल

टॉक्सिक लोकं सुरुवातीला खूप आकर्षक आणि प्रेमळ वाटतात. ते तुमचं खूप कौतुक करतात, प्रेमाचा वर्षाव करतात. पण नंतर हेच लोक हळूहळू टीका करू लागतात आणि तुम्हाला कमी लेखू लागतात आणि तुम्ही त्यांचं कौतुक पुन्हा मिळवण्यासाठी धडपडू लागता. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आत्ममूल्याची पायाभूत बांधणी गरजेची आहे.

स्वतःला कमी लेखणं

आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका असणं, स्वतःला कमी लेखणं किंवा आपण प्रेम आणि सन्मानाच्या लायक नाही असं वाटणं हे तुम्हाला टॉक्सिक नात्यांकडे ओढलं जातं. ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असतो ती इतरांकडून होणारा अपमान, दुर्लक्ष सहजपणे सहन करत राहते.

लोकांना सुधारण्याची भावना

काहीजणांना दुसऱ्यांना सुधारण्याची इच्छा असते. समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे, तिचं दु:ख फार मोठं आहे हे पाहून आपण तिच्यासाठी सर्वकाही करावं असं वाटतं. पण अनेकदा समोरची व्यक्ती तुमचं सहानुभूतीसाठी तुमचा वापर करते. पण स्वतः काहीच बदलत नाही.

Signs of a toxic relationship
Marriage ending signs: वैवाहिक जीवनात ४ संकेत दिसले तर समजा नातं तुटण्याच्या मार्गावर आहे; वेळीच चुका सुधारा

एकटेपणाची भीती

‘एकटं राहणं नको’, ‘माझ्यासोबत कोणी तरी हवंच’, ‘सिंगल असणं म्हणजे अपयश’ अशा विचारांनी अनेक जण चुकीच्या नात्यांमध्ये अडकून राहतात. समाजसुद्धा एखाद्याला लग्न केलं नसेल, पार्टनर नसेल तर तो अपूर्ण असल्यासारखं पाहतो. अशा भीतीचा फायदा टॉक्सिक व्यक्ती उचलतात.

Signs of a toxic relationship
Extramarital affairs : धक्कादायक! भारतातील या शहरात विवाहबाह्य संबंध ठेवणारे सर्वाधिक; मायानगरी मुंबईत काय आहे अवस्था?

नात्यातील भांडणं

काही नात्यांमध्ये सतत वाद, गैरसमज, भांडणं आणि पुन्हा एकत्र येणं या सगळ्याला ‘प्रेम’ मानलं जातं. ही परिस्थिती अनेकांना रोमांचक वाटते. मात्र असं होत असेलतर तुम्ही सावध राहिलं पाहिजे.

Q

टॉक्सिक नात्यांकडे लोक का आकर्षित होतात?

A

भूतकाळातील अनुभव, कमी आत्मविश्वास, एकटेपणाची भीती आणि सुधारण्याची भावना यामुळे लोक टॉक्सिक नात्यांकडे आकर्षित होतात.

Q

भूतकाळातील अनुभव नात्यांवर कसा परिणाम करतो?

A

लहानपणी अस्थिर नाती अनुभवली असल्यास, मोठेपणी तशीच नाती "सामान्य" वाटतात, त्यामुळे टॉक्सिक नात्यांमध्ये अडकणं सोपं जातं.

Q

टॉक्सिक व्यक्ती कशी वागते?

A

सुरुवातीला खूप प्रेम आणि कौतुक दाखवते, नंतर हळूहळू टीका करून तुम्हाला कमी लेखू लागते.

Q

दुसऱ्याला सुधारण्याची इच्छा का धोकादायक आहे?

A

कारण समोरची व्यक्ती तुमच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन स्वतः काही बदलत नाही.

Q

एकटेपणाची भीती का टॉक्सिक नात्यात अडकवते?

A

‘एकटं राहणं म्हणजे अपयश’ अशा समाजदृष्टीमुळे लोक चुकीच्या नात्यातही थांबून राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com