Winter Hair Care: हिवाळ्यात केसांसाठी 'या' पाच भाज्या आहेत सर्वोत्तम, आजपासूनच आपल्या आहारात समावेश करा

winter: बदलत्या ऋतूमध्ये तुम्हालाही तुमच्या केसांची काळजी वाटत असेल ना, तर आजपासूनच आम्ही सांगितलेल्या या पाच भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या केस निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करते. आपले केस नैसर्गिकरित्या रेशमी चमकदार बनवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
Hair Growth Oile
Hair Growth Saam TV
Published On

हिवाळा पूर्णपणे आला नसताना केस गळणे, कोंडा आणि कुरळेपणा यासारख्या समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात.  या ऋतूत केसांना काय लावावे आणि काय लावू नये?  हा प्रश्न एक मोठे आव्हान बनतो, कारण कोरड्या वाऱ्यामुळे केस निर्जीव होतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यावर काहीही लावू शकत नाही. काहीही न लावता तुम्ही केसांची चांगली काळजी घेऊ शकता असं म्हटलं तर!  होय, हिवाळ्याच्या या ऋतूत केसांच्या समस्यांसोबतच त्यांच्या उपायांचाही समावेश होतो.  त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात येणाऱ्या त्या ५ जादुई भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतात.

१. पालक

पालकामध्ये भरपूर जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात आणि टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात.  पालकामध्ये लोह देखील मुबलक प्रमाणात आढळते जे त्यांना मजबूत बनविण्यास मदत करते आणि कोंडा सारख्या समस्या कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Hair Growth Oile
Taapsee Pannu Fitness Tips: तापसीसारखी फिगर हवी आहे? फिटनेससाठी या टिप्स फॉलो करा

२. लीफ कोबी

अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेली पालेभाजी आहे ज्याला लीफ कोबी देखील म्हणतात.  ही भाजी, ज्याला पोषक तत्वांचा खजिना म्हटले जाते, केसांना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि त्यांना अकाली राखाडी होण्यापासून प्रतिबंधित करते.  लीफ कोबीमामध्ये व्हिटॅमिन के देखील आढळते जे केस मजबूत करते आणि केस गळणे कमी करते.

३. बीन्स

अशा अनेक भाज्या आहेत ज्या खाताना लोक नाक मुरडतात, जसे की बीन्स, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की बीन्स हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि केसांच्या वाढीसाठी याची सर्वात जास्त गरज आहे.  याशिवाय त्यात लोह आणि झिंक देखील आढळतात ज्यामुळे केस मजबूत होतात आणि गळणे देखील थांबते.

४. पुदिना

हिवाळ्यात चटणी म्हणून मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पुदिन्यात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केवळ टाळूला थंडावा मिळत नाही तर केसंमधली खाज आणि जळजळ कमी होते. त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मँगनीज आणि पोटॅशियम सारखी खनिजे देखील असतात.

५. ब्रोकोली

ब्रोकोली व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते आणि केस मजबूत करते.  ब्रोकोलीचा आपल्या आहारात सॅलड, भाज्या आणि ज्यूसच्या रूपात समावेश करून तुम्ही केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकता आणि त्यांना आणखी सुंदर बनवू शकता.

Edited by-Archana Chavan

Hair Growth Oile
Palak Puri Recipe : अवघ्या 10 मिनिटात खस्ता पालक पुरी; वाचा संपुर्ण रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com