Pulwama Attack : आजही थरकाप उडवतो पुलवामा अटॅक, एकाच वेळी भारतीय सैन्य दलातील 40 जवानांनी गमवाले प्राण!

4th Anniversary Of Pulwama Attack : 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफचा ताफा पुलवामा येथे पोहोचला तेव्हा एका कारने ताफ्याच्या बसला धडक दिली.
Pulwama Attack
Pulwama Attack Saam Tv
Published On

Black Day For India : चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.

या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यानंतर भारताने (India) ज्या प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला, तो यापूर्वी कधीच घडला नव्हता. भारताने कठोर पावले उचलत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला.

या हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी (Soldiers) बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आज या खास प्रसंगी, 14 फेब्रुवारी 2019 रोजी काय घडले आणि त्या हल्ल्यानंतर काय झाले ते जाणून घेऊया.

सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला -

ती तारीख होती 14 फेब्रुवारी आणि वर्ष 2019. सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. या ताफ्यातील बहुतांश बस या होत्या ज्यात जवान बसले होते.

जेव्हा हा ताफा पुलवामाला पोहोचला तेव्हा पलीकडून एक कार आली आणि त्या ताफ्याच्या बसला धडकली. बसला धडकलेल्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. अशा परिस्थितीत टक्कर होताच स्फोट झाला आणि त्यात 40 CRPF जवान शहीद झाले.

या हल्ल्यानंतर भारताने असा धडा शिकवला -

  • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली. या पावलांमुळे पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले.

  • 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये प्रवेश केला आणि हवाई हल्ल्यांद्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

  • 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे हवाई दल भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले आणि हवाई हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलही खाली उतरते. मात्र, यादरम्यान भारतीय मिग-21 पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात येते आणि पाकिस्तानात येते. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी मिग-21 पायलट अभिनंदन वर्धमानला ताब्यात घेतले.

  • 1 मार्च 2019 रोजी, अमेरिका आणि इतर देशांच्या दबावामुळे, पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन वर्धमानची सुटका केली.

  • पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडले. इतकेच नाही तर पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जाही भारताकडून काढून घेण्यात आला. त्यामुळे आर्थिक आघाडीवर पाकिस्तानला मोठा फटका सहन करावा लागला.

  • भारत सरकारने फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ऑन मनी लाँडरिंग (FATF) कडे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com