Viral News : नॉनव्हेज लव्हरची पहिली पसंद चिकन-मटण नाही, तर टर्कीची किंमत ऐकून थक्कच व्हाल!

Viral Update : कोंबडी सारख्या दिसणारी टर्कीला परदेशात क्रिस्मस आणि इतर सणाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी असते.
Viral News
Viral News Saam Tv
Published On

Viral News : तुम्हाला जर नॉनव्हेज घालायला आवडत असेल तर आता तुमच्या नॉनव्हेज लिस्ट मध्ये टर्कीला सामील करा. सतत चिकन आणि मटण खाऊन कंटाळा आला असेल तर काही तरी नविन आणि चवदार म्हणून टर्की हा उत्तम पर्याय असेल. पण टर्की नक्की आहे तरी काय?

कोंबडी सारख्या दिसणारी टर्कीला परदेशात क्रिस्मस आणि इतर सणाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी असते. मटणाच्या तुलनेत टर्कीमध्ये 50% पर्यंत चरबी असते. हृदयरोगी असणाऱ्यांसाठी हे नॉनव्हेज मधील खूप चांगला पर्याय आहे.

Viral News
Viral News : कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कंपनीकडून भन्नाट सूट; स्क्रीनवरील मॅसेज वाचून स्वतःच्या डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

पिंपरा रोड,चंपारण येथील छोटू चिकन शॉपचे मालक इश्तियाक यांनी असे सांगितले की, आज काल त्यांच्या दुकानात चिकन (Chicken) नाहीतर टर्कीची अधिक मागणी लोक करत आहे. टर्की किलोने नाहीतर पूर्ण विकली जात आहे.

जवळजवळ सात ते आठ किलो वजनाच्या टर्कीची किंमत 45,000 ते 50,000 रुपयांपर्यंत आहे. लोकांना हे खायला खूप आवडते त्यामुळे महाग असून सुद्धा लोक (People) याची मागणी अधिक प्रमाणात करत आहे. टर्कीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहे, परंतु सध्या तरी इथे त्याची एकच प्रजाती विकली जात आहे ती पूर्णपणे पांढरी प्रजाती आहे.

पूर्णपणे फायद्याचा करार -

इश्तियाक सांगतात की सात ते आठ किलो टर्कीच्या मागे हजार रुपये नफा होतो. हा नफा फक्त मास विक्रीतच नाही तर टर्कीच्या शेतीत देखील आहे. टर्कीला 6 ते 7 महिने वाढवण्यासाठी जास्तीत जास्त 500 ते 1000 रुपये लागतात.

Viral News
Viral News: आश्चर्यकारक! हृदयाचं ऑपरेशन सुरु असताना महिलेने दिला बाळाला जन्म, दोघे सुखरुप

सोबतच त्याचे एक पिल्लू 7 ते 8 किलोचे होते ज्याची किंमत पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे. इतर सर्व खर्च लक्षात घेऊन हजार रुपये नफा सहज मिळतो. सहा महिने झाल्यानंतर टर्की अंडी देण्यास सुरुवात करते.त्या अंडीची किंमत 35 ते 40 रुपये आहे.

मास खाणे हृदयाच्या रुग्णांसाठी हानिकारक समजले जाते, पण अशा रुग्णांसाठी टर्कीचे मास आणि अंडी दोन्ही खाणे फायदेशीर ठरेल कारण टर्कीच्या मासामध्ये शेळीच्या मासापेक्षा 50 टक्के कमी चरबी असते. नॉनव्हेज लव्हरच्या मते, चिकन पेक्षा ही अधिक चवदार हे मास आहे. तंदुरी, घट्ट रसाळ आणि भाजलेले मास म्हणून हे खाल्ले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com