मेडिक्लेम देण्यासाठी कंपनी टाळाटाळ करते; आरोग्य विम्यासाठी लागू केले नवे नियम

मेडिक्लेमसाठी कोणते नवे नियम जारी केले हे जाणून घ्या.
Find out what new rules have been issued for Mediclaim
Find out what new rules have been issued for Mediclaimब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

कंपनी आता आरोग्य विमा काढलेल्या होल्डरला मेडिक्लेमचा फायदा देण्यास नकार देऊ शकत नाही. यासाठी दिल्ली राज्यातील ग्राहक आयोगाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा -

आयोगाने सांगितले आहे की, ज्या कंपन्या आरोग्य विमाची पॉलिसी देणार आहेत ते स्वत: तपासून पाहातील. जी व्यक्ती विमा काढणार आहे तिला कोणता गंभीर आजार आहे का ? जर त्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीने पॉलिसी काढताना तसे त्यात नमूद करावे. जर आपल्याला एखादा आजार असेल तर त्यासाठी देखील अनेक नियम असतील. असे निर्दशनास आले आहे की, कंपनी आयत्यावेळी विमा पॉलिसीची जी काही रक्कम असते ती देण्यास नकार देते. कंपनी असे देखील सांगते की, विमा पॉलिसी काढणाऱ्यास त्यावेळी कोणताही आजार नव्हता किंवा पॉलिसी काढताना आम्हाला याबाबत कोणतीही माहिती न दिल्यामुळे ते आरोग्य विमा देण्यास नकार देतात. हे सगळ लक्षात घेता ग्राहक आयोगाने यासाठी महत्त्व पूर्ण पाऊल उचलेले आहे. ग्राहक आयोगाने सांगितले आहे की, नंतर या आजाराचे निदान लागण्यापेक्षा जी कंपनी आरोग्य विमा (Health insurance) देणार आहे त्या स्वत:हून या गोष्टीचा तपास करावा.

Find out what new rules have been issued for Mediclaim
अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने अल्झायमरचा धोका वाढू शकतो

विमा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना ही माहिती अवश्य द्यावी-

काही आजार हे असे असतात ज्याच्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा विमा मिळू शकत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतिबिंदू, हर्निया यांसारख्या आजारांवर विमा कंपनी कोणताही दावा करत नाही. या आजारांवर मेडिक्लेममध्ये दिले जात नाही. जर हे आजार आधीपासून असतील आणि आपण विमा कंपनीला याबाबत सांगितल्यानंतर ते आपल्याला २४ किंवा ३६ महिन्यात आपल्या या आजाराला कवर करतात. काही कंपन्या या मेडिक्लेममध्ये कर्करोगासाठी विमा देत नाही तर काही कंपन्या या कर्करोगासाठी विमा पॉलिसी देतात.

काही कंपन्या (Company) या पॉलिसी बाबत पूर्ण माहित देत नसल्यामुळे दिल्ली आयोगाने यासाठी ठोस पाऊल उचलेले आहे. विमा देणाऱ्या कंपन्यानी ग्राहकांचे चेकअप करुन त्यांना ती पॉलिसी द्यावी असा नियम जारी केला आहे.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com