

हार्ट अटॅक हा अचानक येतो असं सर्वांना वाटतं. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मोठा हार्ट अटॅक येण्यापूर्वी म्हणजे २४ ते ४८ तास आधी तुमचं शरीर तुम्हाला सावध करत असतं. वैद्यकीय भाषेत म्हटल्या जाणाऱ्या प्रोड्रोमल विंडोकडे दुर्लक्ष करणं तुमच्या महागात पडू शकतं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा होणं कमी होतो आणि त्यावर दबाव वाढतो. हा अडथळा पूर्ण नसतो त्यामुळे रूग्णाने वेळेत उपचार घेतले तर होणारं नुकसान टाळता येतं.
सर्वात सुरुवातीच्या आणि सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक आणि अस्पष्ट थकवा येणं. हा थकवा सामान्य थकव्याप्रमाणे नसतो. यामध्ये बऱ्याच रूग्णांना चालणं किंवा हलकं काम करणंही कठीण होऊन बसतं.
हार्ट अटॅकच्या आधी अनेकांना छातीत जळजळ जाणवू लागते. अशावेळी रूग्णाला विश्रांती घेतल्याने तात्पुरता त्रास कमी वाटू लागतो. लोक त्याला पित्ताचा त्रास किंवा मसल पेन समजतात. मात्र ही परिस्थिती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जर तुम्हाला विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. हे हृदय शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवत नसल्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी हे लक्षण अचानक दिसू लागतं आणि थकवा किंवा छातीत अस्वस्थता येते तेव्हा त्वरित वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे.
अनेकदा कधीकधी, वेदना छातीपुरती मर्यादित नसते. ती डाव्या हाताला, खांद्याला, मानाला, जबड्याला, पाठीच्या वरच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात पसरू शकते. ही लक्षणं महिला, वृद्ध आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सामान्यपणे दिसून येतात. म्हणूनच हार्ट अटॅकपूर्वीच्या लक्षणांचं निदान अनेकदा उशिरा होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.