Healthy Tiffin Recipe : रोजच्या पोळी-भाजीचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा 'हे' चवदार थालीपीठ

Thalipeeth Recipe : भाजणीचे थालीपीठ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला पाहायला आणि खायला मिळेल. तुमच्याकडे जर भाजणीचे पीठ तयार असेल तर तुम्ही हा पौष्टीक नाश्ता किंवा टिफीन बॉक्ससाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता.
Thalipeeth Bhajani Recipe
Marathi RecipeCANVA
Published On

भाजणीचे थालीपीठ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला पाहायला आणि खायला मिळेल. तुमच्याकडे जर भाजणीचे पीठ तयार असेल तर तुम्ही हा पौष्टीक नाश्ता किंवा टिफीन बॉक्ससाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. हे भाजणीचे वडे तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराचे तयार करू शकता. लहान मुलांना टिफीन बॉक्ससाठी हे थालीपीठ दिल्यावर त्यांच्या टिफीन कधीच रिकामा राहणार नाही. चला तर जाणून घेऊ रेसिपी.

थालीपीठ तयार करण्याचे साहित्य -

भाजणी पीठ - 1 वाटी

चिरलेला कांदा - 1 मध्यम आकाराचा

चिरलेली कोथिंबीर - 2 चमचे

हिरव्या मिरच्या - 2 (बारीक चिरून)

आलं-लसूण पेस्ट - 1 चमचा

जिरे - 1 चमचा

Thalipeeth Bhajani Recipe
Intestinal Cleansing : आतड्यांतील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा नैसर्गिक उपाय; 'या' पदार्थाचे नियमित करा सेवन

हळद - 1/4 चमचा

तिखट - 1/2 चमचा (आवडीनुसार)

मीठ - चवीनुसार

तुप/तेल - थालीपीठ भाजण्यासाठी

पाणी - पीठ मळण्यासाठी

थालीपीठ तयार करण्याची कृती -

एका भांड्यात 1 वाटी भाजणीचं पीठ घ्या.

त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, आणि मीठ मिक्स करा. थोडं-थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळा.

थालीपीठ तयार करणे - गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडंसं तूप/तेल लावा. मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन तव्यावर ठेवा. हाताला पाणी लावून तो थोडा दाबत थालीपीठासारखा पसरवा. त्यामध्ये 2-3 छिद्र करा (त्यातून तूप/तेल टाकण्यासाठी). थालीपीठाला झाकण ठेवून मंद आचेवर भाजा. एका बाजूने सोनेरीसर भाजल्यावर दुसऱ्या बाजूने पलटून भाजा.

थालीपीठ सर्व करणे - गरम थालीपीठ लोणी, दही किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करा.

Thalipeeth Bhajani Recipe
Brushing Tips: 99% लोकांना ब्रश करण्याची योग्य पद्धत माहित नाही, 'या' चुकीमुळे होतात गंभीर परिणाम, वाचा दात स्वच्छ करण्याची पद्धत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com