Siddhi Hande
कोथिंबीर वडी ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर एकदम बारीक चिरुन घ्या.
त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. तुम्ही त्यात थोडसं तांदळाचे पीठदेखील टाकू शकतात.
यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घ्या.ही पेस्ट त्या पीठात टाकून मस्त मिक्स करुन घ्या.
त्यानंतर पीठात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. त्यानंतर सर्व मिक्स करुन घ्या.
या मिश्रणात तु्म्ही मीठ टाका. यात पाणी टाकू नका.
त्यानंतर वड्या बनवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्या.
यानंतर कोथिंबीर वडीच्या बारीक काप करुन घ्या. ते तव्यावर तेल टाकून फ्राय करा.
Next: अळीवाचे लाडू थंडीत Must, हाडं होतील Strong