Shreya Maskar
थंडीत अळीवाचे लाडू खाणे खूप पौष्टिक मानले जाते.
अळीवाचे लाडू बनवण्यासाठी अळीव बिया, खोबरं, गूळ, बदाम, वेलची पावडर, काजू पावडर, मनुके आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
अळीव लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम अळीव बिया दुधात भिजत ठेवा.
अळीव भिजल्यावर त्यात खोबर आणि गूळ मिक्स करून मंद आचेवर शिजवा.
त्यानंतर यात काजू पावडर, बदाम पावडर आणि वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
नंतर मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या.
अशाप्रकारे खमंग अळीव लाडू तयार झाले.
थंडीत रोज सकाळी एक अळीव लाडू खा म्हणजे तुमची हाडे बळकट होतील.