Thailand Visa Free : व्हिसाशिवाय फिरता येणार थायलंड! ऑफर काही काळापर्यंत, या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Travel Withouth Visa : भारतातून थायलंडला फिरायला जाण्याचा विचार करताय, तर आता एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.
Thailand Visa Free
Thailand Visa FreeSaam Tv
Published On: 

Thai Tourism :

भारतातून थायलंडला फिरायला जाण्याचा विचार करताय, तर आता एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. यापुढे थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. थायलंडच्या सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे की भारत आणि तैवानमधून येणाऱ्या लोकांसाठी व्हिसाची आता आवश्यकता माफ केली जाणार आहे. थाई टुरिझमनुसार, ही सूट पुढील महिन्यापासून मे 2024 पर्यंत दिली जाईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"भारत आणि तैवानमधून येणारे लोक 30 दिवसांसाठी व्हिसाशिवाय थायलंडमध्ये प्रवेश करू शकतात," थायलंड थाई टुरिझमने जाहीर केले. थायलंड व्हिसा सूट आणि पर्यटकांसाठी (Tourist) राहण्याचा कालावधी वाढवण्यासह प्रवाश्यांसाठी व्हिसा नियम शिथिल करण्याची शक्यता आहे.

सध्या, भारतातील प्रवाशांना 2 दिवसांच्या थायलंड (Thailand) व्हिसासाठी 2000 भाट (सुमारे $57) भरावे लागतात. थायलंडच्या नवीन सरकारचे उद्दिष्ट पुढील वर्षी परदेशी पर्यटकांकडून 3.3 ट्रिलियन बाथपर्यंत वाढवण्याचे आहे. ज्यामध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री सर्वोत्तम Short-Term Economic Stimulus देते. बँक ऑफ थायलंडच्या आकडेवारीनुसार, पर्यटनाचा जीडीपीमध्ये सुमारे 12% वाटा आणि नोकऱ्यांमध्ये सुमारे एक पंचमांश योगदान आहे.

Thailand Visa Free
Foreign Tours Tips: 'या' देशात फिरण्यासाठी भारतीयांना लागत नाही VISA ची गरज

श्रीलंकेने अलीकडेच 31 मार्च 2024 पर्यंत पायलट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून भारत, चीन आणि रशियासह सात देशांतील व्हिसीटर्ससाठी व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा केली. कोविडनंतर, अनेक देशांच्या पर्यटन मंडळांकडून भारतीय प्रवाशांना आकर्षित केले जात आहे. मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियानंतर सुमारे 12 लाख पर्यटकांनी या वर्षी आतापर्यंत भारत थायलंडची पर्यटनासाठी चौथी सर्वात मोठी बाजारपेठ (Market) आहे.

Thailand Visa Free
How To Apply For B2 Visa : उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशात फिरायला जायचे आहे? अशा प्रकारे मिळवा US B-2 व्हिसा

भारत सरकारच्या डेटावरून असे दिसून आले आहे की परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या 2011 मध्ये 1.4 कोटींवरून 2019 मध्ये 2.7 कोटींवर पोहोचली आहे. त्यानंतर दोन साथीच्या वर्षांच्या प्रवासावरील निर्बंध आणि बंद आदेशांनंतर, 2022 मध्ये ती पुन्हा 2.1 कोटींवर पोहोचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.