Teachers Day : चुकूनही शिक्षकांना 'हे' गिफ्ट देऊ नका; आनंद होण्याऐवजी टिचर नाराज होतील

Teachers Day Gift Mistake : जर आज तुम्ही तुमच्या शिक्षकांना काही खास गिफ्ट्स देण्याचा विचार करत असाल तर कोणतं गिफ्ट द्यावं आणि कोणतं गिफ्ट देऊ नये याची माहिती जाणून घ्या.
Teachers Day Gift Mistake
Teachers DaySaam TV
Published On

शिक्षक आणि मुलं यांमधील नातं फार अनोखं असतं. प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात शाळेमध्ये दररोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. शाळेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात रोज भर देण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थी जसजसे मोठे होतात तसतसे त्यांना शिक्षक आपल्यासाठी काय मेहनत घेत आहेत हे समजते.

आज शिक्षक दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे आभार मानतो आणि शिक्षकांना काही तरी सुंदर भेट वस्तू देत असतो. मात्र यामध्ये काहीवेळा विद्यार्थी शिक्षकांसाठी असे काही गिफ्ट घेतात ज्याने शिक्षक खुश होण्याऐवजी नाराज होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिक्षकांना कोणते गिफ्ट देऊ नये याची माहिती सांगणार आहोत.

Teachers Day Gift Mistake
Teachers Day: मुला-मुलींनो आवडत्या शिकक्षकांना द्या 'या' भेटवस्तू

घड्याळ

कोणत्याही व्यक्तीला कधीही घड्याळ गिफ्ट करू नका. गिफ्टमध्ये घड्याळ देणे अशुभ मानले जाते. यामुळे ज्या व्यक्तीला गिफ्ट दिले आहे त्यांना काही अडचणी किंवा वाईट गोष्टींचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं जातं.

महागड्या वस्तू

काही विद्यार्थी शिक्षकांनी आपल्यावर खूप खुश व्हावं म्हणून त्यांना जास्त म्हाडगे ब्रँडचे गिफ्ट देतात. मात्र असे केल्याने शिक्षकांना असे गिफ्ट फार ओझे वाटतात. त्यामुळे शिक्षकांना महागड्या वस्तू गिफ्ट देऊ नका.

धार्मिक गिफ्ट

काही विद्यार्थी शिक्षकांना धार्मिक गिफ्ट देतात. यामध्ये देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो असू शकतात. मात्र असे गिफ्ट देताना काहीवेळा गडबड होते. शिक्षका संबंधित देवी देवतांची पूजा करत नसतील तर त्यांना हे गिफ्ट आवडत नाहीत.

पदार्थ

काही विद्यार्थी शिक्षकांना काय आवडते याची आधीच माहिती काढून घेतात. त्यानंतर तो पदार्थ स्वतः बनवून आणतात. किंवा बाहेरून हे पदार्थ विकत घेतात. मात्र अशावेळी जर शिक्षकांना काही अॅलर्जी असेल तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू देऊ नका.

Teachers Day Gift Mistake
Teachers Day: मुला-मुलींनो आवडत्या शिकक्षकांना द्या 'या' भेटवस्तू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com