Tata Motors Truck Utsav : टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी सुरु केला 'ट्रक उत्सव', एलपीटी १९१६ झाला लॉन्च

Tata Motors launches Truck Utsav : भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम 'ट्रक उत्‍सव'च्‍या लाँचची घोषणा केली
Tata Motors Truck Utsav
Tata Motors Truck Utsav Saam tv
Published On

Tata Motors :

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम 'ट्रक उत्‍सव'च्‍या लाँचची घोषणा केली. ट्रक उत्‍सवचा कंपनीची नवीन वाहने व गतीशीलता सोल्‍यूशन्‍सबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा, अद्वितीय मूल्‍यवर्धित सेवांसह नाविन्‍यपूर्ण व तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत ट्रक्‍सना दाखवण्‍याचा उद्देश आहे.

टाटा मोटर्सने ग्राहक लाभ क्षमतेमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला दर्जात्‍मक ट्रक - नवीन एलपीटी १९१६ देखील लाँच केला आहे. ट्रक उत्‍सवच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना त्‍यांच्‍या विशिष्‍ट गरजांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या टाटा मोटर्स प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचे लाभ मिळतील, तसेच त्‍यांना वेईकलसाठी सुलभपणे व सोईस्‍करपणे फायनान्‍स उपलब्‍ध होण्‍यासाठी फायनान्सिंग सहयोगींशी कनेक्‍ट होण्‍याची संधी देखील मिळेल. दिल्‍ली, फरिदाबाद, गुरूग्राम, बेंगळुरू, जयपूर व चेन्‍नई येथे ट्रक उत्‍सवचे आयोजन करण्‍यात येईल.

Tata Motors Truck Utsav
Tata Nexon : भन्नाट फिचर्ससह ११ व्हेरियंट्समध्ये फेसलिफ्ट लॉन्च! किंमत पाहा

ट्रक उत्‍सव येथे अनावरण करण्‍यात आलेला टाटा (Tata) एलपीटी १९१६ त्‍याच्‍या विभागातील सर्वोच्‍च पेलोड देतो, ज्‍यामुळे फ्लीट मालकांना अधिक उत्‍पन्‍न व फायदा मिळण्‍याची खात्री मिळते. या ट्रकमध्‍ये प्रमाणित व इंधन-कार्यक्षम ३.३-लीटर डिझेल इंजिनची शक्‍ती आहे, तसेच ड्रायव्‍हरला आरामात ड्रायव्हिंग करता येण्‍यासाठी उल्‍लेखनीय एलपीटी केबिन आहे.

एलपीटी १९१६ सर्वाधिक फायदा मिळवण्‍यासोबत विश्‍वासार्ह ड्रायव्हिंगच्‍या खात्रीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या ट्रकमध्‍ये (Truck) आधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत- जसे क्रूझ कंट्रोल, गिअर शिफ्ट अडवायजर, ड्युअल-मोड फ्यूएल इकॉनमी स्विच, लो-रोलिंग-रेसिस्‍टण्‍स टायस्र आणि इंजिन ब्रेक.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍सचे व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ''टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही करत असलेल्‍या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये ग्राहक-केंद्रित गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आमचा नवीन उपक्रम ट्रक उत्‍सव बहुमूल्‍य ग्राहक व सहयोगींशी संलग्‍न होण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

या उपक्रमाची खासियत म्‍हणजे टाटा एलपीटी १९१६, जे ग्राहकांना फायदा देण्‍यासाठी विभागात उच्‍च मानक स्‍थापित करेल. या ट्रकमध्‍ये इंधन-कार्यक्षम पॉवरट्रेन व दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. टाटा उत्‍सव आमच्‍या ग्राहकांशी संलग्‍न होण्‍याकरिता परिपूर्ण व्‍यासपीठ देतो, तसेच बहुमूल्‍य माहिती व सहयोगांना चालना देतो. आम्‍ही या विशिष्‍ट इव्‍हेण्‍टमध्‍ये सर्वसमावेशक संवाद साधण्‍याकरिता ग्राहकांचे स्‍वागत करण्‍यास उत्‍सुक आहोत.''

Tata Motors Truck Utsav
Benefits Of Soaked Raisins : आठवडाभर खा भिजवलेले मनुके, हे ५ आजार होतील छुमंतर

टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍सची श्रेणी गेल्‍या सात दशकांपासून राष्‍ट्रनिर्मितीमध्‍ये योगदान देत आहे. कंपनीने बीएस-६ फेज २ अनिवार्य नियमांचे पालन करत वाहनांना अधिक वैशिष्‍ट्ये, कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स आणि संपन्‍न मूल्‍यवर्धनासह 'बंपर टू बंपर' अपग्रेड केले आहे. दर्जात्‍मक वाहन खरेदी करण्‍यासह फ्लीट मालकांना सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, कमी कार्यसंचालन खर्च, उच्‍च वेईकल अपटाइम, रिअल-टाइम वेईकल ट्रॅकिंग आणि फ्लीट कार्यक्षमपणे चालवण्‍यासाठी विश्‍लेषण मिळते.

कंपनीने विविध उद्योग अग्रणी वैशिष्‍ट्ये देखील सादर केली आहेत, जसे जागतिक दर्जाच्‍या केबिन्‍स, विभागामध्‍ये सर्वोच्‍च लोड वाहून नेण्‍याची क्षमता असलेली वाहने, सानुकूल बॉडी स्‍टाइल्‍स, लांब डेक्‍स, आधुनिक वैशिष्ट्ये आणि ग्राहकांना अधिक निवड देण्‍याकरिता विविध पॉवरट्रेन्‍स. वाहने दर्जात्‍मक फ्यूएल इकॉनॉमी, कार्यक्षमता व ड्रायव्हिंग क्षमता, सुधारित ड्रायव्‍हर कम्‍फर्ट, सुधारित सर्विस कालावधी व फ्लूईड रिप्‍लेसमेंट फ्रीक्‍वेन्‍सीसह येतात.

Tata Motors Truck Utsav
Most Famous Waterfall In Vasai : मुंबईजवळ वसलेला अन् डोळ्यांचं पारणं फेडणारा, वसईतला धबधबा पाहिलात का?

४जी-सक्षम कनेक्‍टीव्‍हीटी आणि फर्मवेअर ओव्‍हर-द-एअर (एफओटीए) क्षमतेसह कंपनीने कनेक्‍टीव्‍हीटीला नवीन उंचीवर नेले आहे. या सर्व वैशिष्‍ट्यांना भारतातील सर्वात मोठे व सर्वात विश्‍वसनीय सेल्‍स व सर्विस नेटवर्कचे पाठबळ आहे, जे प्रशिक्षित स्‍पेशालिट्ससह कार्यान्वित आहे आणि टाटा जेन्‍यूएन पार्टस् सुलभपणे उपलब्‍ध करून देतात.

Tata Motors Truck Utsav
Worst Foods for Heart : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? आहारातल्या या पदार्थांना लगेच करा बाय बाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com