Tasty Breakfast: अनेक व्यक्ती शाकाहारी असतात. मात्र तरी देखील कुणाला लेग पीस खाताना पाहून त्यांना देखील ते खावं वाटतं. बऱ्याच व्यक्ती देवाला चालत नाही त्यामुळे मांसाहार करत नाहीत. तर काहींना नॉनवेज जेवणाची चवच आवडत नसते. त्यामुळे ते नॉनवेज खाणे टाळतात. मात्र जर तुम्ही शाकाहारी आहात आणि तुम्हाला लेगपीस खावे वाटतायत तर त्यावर एक उपाय शोधला आहे. (Latest Marathi News)
शाकाहारी व्यक्तींसाठी वेज लेगपीस बाजारात आलेत. हे लेगपीस चवीला फार उत्तम आहेत आणि अगदीच नॉनवेज लेगपीस सारखे दिसतात. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वेज लेगपीसची मोठी चर्चा सुरू आहे. एका इन्स्टाग्राम अकाउंटवर वेज लेगपीस बनवतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वेज लेगपीस नेमके कसे बनवायचे? त्याची रेसीपी काय आहे? हे जाणून घेऊ.
व्हेज लेग पीससाठी तुम्हाला पुढील साहित्याची गरज आहे. यासाठी फ्रोझन मटार अर्धी वाटी, अर्धी वाटी भिजवलेले सोया चंक्स पावडर, जिरे एक चतुर्थांश टीस्पून, किसलेले पनीर एक चतुर्थांश कप, 1 हिरवी मिरची चिरलेली, एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा.
यासह अर्धा मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्या. 1/4 चमचे हळद पावडर, 3-4 चमचे तेल, 1/4 चमचे लाल तिखट, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर, 7-8 ब्रेड स्लाइस, 2 चमचे ब्रेडचे तुकडे, चवीनुसार मीठ, मैदा एवढे साहीत्य असणे आवश्यक आहे.
त्यानंतर आता वेज लेगपीस बनवण्याची पद्धत जाणून घेऊ
शाकाहारी लेगपीस बनवण्यासाठी सुरुवातीला पॅन गरम करा. त्यात तेल घालून घ्या. नंतर तेलात जिरे टाका. आता त्यात हिरवी मिरची,लाल तिखट, कांदा घालून थोडावेळ परतून घ्या आणि नंतर त्यात टोमॅटो, हळद, मीठ घाला. मिश्रण दोन मिनिटे शॅलो फ्राय करा नंतर त्यात मटार, सोया चंक्स पावडर आणि पनीर घाला. नंतर हे मिश्रण आणखी दोन मिनिटे फ्राय करुन थंड करुन घ्या.
ब्रेडची पुरी लाटा. तयार मिश्रण या पुरीत भरा आणि त्याला लेगपीसचा आकार द्या. शेवटी ब्रेड क्रममध्ये टाकून हे तळून घ्या. वेज लेगपीस तयार झालेत. हे वेज लेगपीस चवीला अतीशय उत्तम लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.