Ruchika Jadhav
मेथीचे लाडू कडू असल्याने अनेक व्यक्ती हे लाडू खाणे टाळतात.
मेथीचा लाडू गोड व्हावा यासाठी मेथी रात्रभर दूधात भीजत ठेवावी.
दुसऱ्या दिवशी भिजलेली मेथी बारीक करुन तुपात भाजून घ्यावी.
त्यात खारीक पावडर मिक्स करुन घ्या.
सुके आणि किसलेले खोबरे यामध्ये टाका.
मेथीच्या लाडूमध्ये हलीम आणि डींक देखील टाकावा.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स यात मिसळवू शकता.
गुळाचा पाक करुन त्यात हे मिश्रण मिसळवून घ्या. आणि झटपट लाडू बनवा.