EV Care Tips in Monsoon : इलेक्ट्रिक बाइक वापरताय? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

Monsoon Care Tips : पावसाळ्यात इलेक्ट्रिक बाइक वापरताना तुम्हालाही भीती वाटते का ?
EV Care Tips in Monsoon
EV Care Tips in MonsoonSaam Tv
Published On

EV Care Tips : पावसाळा म्हटलं की, काहींसाठी सुखद धक्का तर काहींसाठी अधिक त्रासदायक. प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सगळे इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देतात. ते खरेदी करताना किंवा चार्ज करताना आपल्याला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागत नाही.

तुमच्याकडे देखील इलेक्ट्रिक (Electric) टू व्हिलर असेल आणि पावसाळ्यात त्याचा वापर करताना भीती वाटत असेल तर घाबरु नका. गर्दीच्या वेळी किंवा पावसाळ्यातही तुम्ही तुमची ईव्ही कार ही अगदी नियमितपणे वापरु शकता, पावसाळ्यात (Monsoon) यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून कशी काळजी (Care) घ्याल हे जाणून घेऊया

EV Care Tips in Monsoon
Bike Ride Tips : नजर हटी दुर्घटना घटी ! पावसाळ्यात बाईक चालवताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...

1. कव्हर

पावसाच्या पाण्यामुळे व दमट हवामानामुळे आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्याची भीती वाटते. या वातावरणात आर्द्रता व बाष्पीभवनापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी आपण त्याला कव्हर लावू शकतो.

2. स्वच्छ ठिकाणी ठेवा

पावसाळा चालू असताना तुमची ईव्ही स्वच्छ ठिकाणी पार्क करा, कारण पावसाळ्यात तिचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते.

EV Care Tips in Monsoon
Monsoon Car Tips : पावसाळ्यात अचानक तुमची बाईक-कार अडकली तर, कशी वाचवाल ? जाणून घ्या या खास टिप्स

3. नियमित तपासा

तुमची इलेक्ट्रिक दुचाकी नियमितपणे तपासत राहा, जेणेकरून त्यात काही कमतरता असेल तर ती दूर करता येईल. विशेषतः जर त्याची बॅटरी परफॉर्मन्स योग्य होत नसेल. अशा स्थितीत बॅटरी खराब होण्याचीही शक्यता असते.

EV Care Tips in Monsoon
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

4. अशा वेळी चालवू नका

जर तुम्हाला पावसाळ्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागत असेल, जेव्हा खूप पाऊस पडत असेल, तर तुम्ही बाईक चालवणे टाळावे. कारण इलेक्ट्रिक स्कूटर्स वॉटर प्रूफ नसून वॉटर रेझिस्टन्स असतात. याशिवाय मुसळधार पावसात त्या अधिक काळ चालत नाही त्यामुळे काही दुर्घटनाही घडू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com