
आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाचा पारा चढला आहे. या काळात लोक फ्रिजमधील पाणी पिण्यास सरूवात करतात. कारण फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यानं आराम मिळतो. अगदी लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच फ्रिजमधील तंड पाणी पिऊन आपलं शरिर व आत्मा थंड करतात. परंतु, असे पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. हे परिणाम जाणून घेतल्यास तुम्ही तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेऊ शकता.
1. पचनक्रियेत अडथळा
थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्था मंदावते आणि अन्न पचण्यास त्रास होतो. अपचन, गॅस, आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
2. पोट बिघडतं
तुम्ही जर थंड पाणी प्यायलात तर पोटासंबंधीत वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही जेव्हा उन्हातून घरात येता आणि लगेचच थंड पाणी पिता तेव्हा आतड्या आकुंचन पावतात. असातच तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या होतात.
3. हृदयासाठी हानिकारक
गरमीच्या दिवसांमध्ये साधं पाणी प्यायल्यानं सहजपणे तहान भागत नाही. सारखं थंड पाणी प्यावंसं वाटतं. परंतु, सारखं थंड पाणी प्यायल्यानं हृदयाची गती कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. विशेषतः हृदयविकार असलेल्या लोकांनी थंड पाणी टाळले पाहिजे.
4. मेंदूवर परिणाम
अतिथंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. सातत्यानं थंड पाणी पित असाल तर ब्रेन फ्रीजची समस्याही होऊ शकते. थंड पाणी पिण्यावर करण्यात आलेल्या रिसर्चवरून हे सिद्ध झाले आहे. थंज पाणी नसांमध्ये पोहोचले की, मेदुला एक संदेश देतो. त्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
5. थकवा आणि कमजोरी
थंड पाणी प्यायल्यानं शरिरातील मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट याग्यपणे रिलीज करू शकत नाही. हे थकवा आणि कमजारीचं कारण करू शकतं.
6. कफ होतो
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्यानं शरीरात कफ तयार होतो. शरीरात जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याच कारणानं सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवन केल्यावर थंड पाणी पिणं टाळा.
1. कोमट किंवा माठातील पाणी प्या.
2. पाण्यात तुळशीची पाने किंवा लिंबू घालून प्या.
3. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित पाणी प्या, पण थंड पाणी टाळा.
थंड पाणी पिण्याचा मोह होत असेल, तर वरील परिणाम लक्षात ठेवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.