Kitchen Tips : स्वयंपाकघर व त्यातील भांडी ही प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यातील एखादी जरी वस्तू ही खराब झाली की, गृहिणीला चिंता सतावते.
कधी कधी जेवण बनवताना चुकून आपल्याकडून जेवणाची भांडी ही जळतात किंवा जेवण बनवल्यानंतर अनेकदा भांडी जळतात पण भांडी जळणे ही सामान्य बाब आहे. यामुळे महिलांना (Womens) भांडी घासताना अधिक त्रास होतो.
काही भांड्यांचे डाग इतके घट्ट असताता की, कितीही प्रयत्न केल्यानंतरही ते निघत नाही. त्या जळलेल्या भांडयांतून उग्र वास येऊ लागतो व त्यात जेवण बनवल्यामुळे त्याची चव देखील बदलते.
त्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अशा पदार्थाचा वापर करुया ज्यामुळे हे डाग जाण्यास व त्याचा उग्र वासापासून आपली सुटका होईल. यासाठी आपल्या कांदा (Onion) फायदेशीर ठरेल.
कांद्याचा वास हा उग्र जरी असला तरी जळलेल्या भांड्यांपासून तो आपली सुटका करू शकतो. त्यासाठी त्याचा वापर कसा करावा जाणून घेऊया.
१. व्हिनेगर व कांदा -
जळलेल्या भांड्याच्या डागापासून मुक्त होण्यासाठी, कांदा आणि व्हिनेगर घ्या. यानंतर एका भांड्यात अर्धा कप कांद्याचा रस आणि अर्धा कप व्हिनेगर मिक्स करा. नंतर दोन्ही रसांचे मिश्रण तयार करा. यानंतर भांड्याच्या जळलेल्या डागावर लावून ते स्वच्छ करा. त्यामुळे भांडी काही वेळात चमकतील.
२. कांद्याची साल -
जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण कांद्याची साल देखील वापरू शकता. यासाठी जळलेल्या भांड्यात कांद्याची साले टाका, नंतर त्यात पाणी भरून २० मिनिटे उकळा. उकडलेल्या कांद्याची साल त्या पाण्यात पेस्ट सारखी होईल. यानंतर ही पेस्ट जळलेल्या डागावर खरवडून घ्या. भांडीपूर्वी सारखी होण्यास मदत होईल.
३. बेकिंग सोडा व कांदा -
जळलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. यानंतर ब्रशच्या मदतीने जळलेले भांडे स्वच्छ करा. यानंतर जळलेल्या डागावर २ कांद्याचे तुकडे चोळा. असे केल्याने खरखरीत डाग निघून जातात. यानंतर त्या जळलेल्या भांड्यात पाणी टाकून ते राहू द्या. नंतर उर्वरित डाग हलक्या हाताने स्वच्छ करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.