Zinc Deficiency : डाएट न करता अचानक वजन कमी झाले ? असू शकते झिंकची कमतरता, वेळीच 'या' पदार्थांचे सेवन करा

शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या विटामिनची झाल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Zinc Deficiency
Zinc DeficiencySaam Tv
Published On

Zinc Deficiency : चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराला पोषक तत्वांची अत्यंत गरज असते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या विटामिनची झाल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अशातच तुमच्या शरीरामध्ये झिंकचे प्रमाण कमी झाले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून येईल. झिंक हे आपल्या शरीरामधील इम्युनिटी सिस्टमला मजबूत बनवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या रोगांपासून वाचता. चला तर मग पाहूया शरीरामधील कमी होणाऱ्या झिंकच्या प्रमाणामुळे कोणती लक्षणे आढळतात.

Zinc Deficiency
Vitamin P Rich Foods : व्हिटॅमिन- पीची कमतरता ठरु शकते हृदयविकार व मधुमेहांसाठी घातक, 'या' पदार्थांचे वेळीच करा सेवन !

शरीरामध्ये झिंकचे प्रमाण कमी झाल्यावर ही लक्षणे दिसून येतात.

1. अचानक वजन कमी होणे :

दैनंदिन जीवनातील अनियमित खानपानामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. अशातच आपल्या शरीरामधील झिंकच्या कमतरतेमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. अचानक वजन कमी झाल्याने तुम्ही डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याने झिंकच्या गोळ्या घेऊ शकता.

2. तोंडाची चव जाणे :

झिंकच्या कमतरतेमुळे तोंडाची चव जाते. कोणत्याही पदार्थाचे सेवन केले. तर तो पदार्थ बेचव लागतो. हे सगळ शरीरामधील कमी होणाऱ्या झिंकच्या प्रमाणामुळे होते.

Zinc Deficiency
Zinc Deficiencycanva

3. त्वचे संबंधित समस्या :

शरीरामधील झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्वचेचे रोग होऊ शकतात. त्वचे रोग अनेक प्रकारचे असतात. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे आणि आजाराप्रमाणे वेगवेगळे त्वचेचे विकार उद्भवतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात झिंकचे तत्व असणारे पदार्थ खाल्ले पाहिजे.

4. जास्त प्रमाणात केस गळणे :

शरीरामधील कमी होणाऱ्या झिंकच्या प्रमाणामुळे तुमचे केस जास्त प्रमाणात गळू लागतात.

5. थकवा जाणवणे :

बऱ्याचदा बदलता जीवनशैलीमुळे आणि शरीरामधील झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो. अशक्तपणाचा त्रास होत असेल तर डॉक्टर बऱ्याचदा जिंकच्या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

Zinc Deficiency
Vitamin Deficiency : 'या' जीवनसत्त्वाची कमतरता अधिक धोकादायक, जडू शकतो मधुमेह व हृदयविकाराचा आजार !

शरीरामधील झिंकची कमी पूर्ण करण्यासाठी हे पदार्थ खा :

1. शेंगदाणे :

शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक उपलब्ध असते. याशिवाय यामध्ये आयन, व्हिटॅमिन (Vitamins) ई, पोटॅशियम, फायबर यांसारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. यामुळे शरीरामधील अनेक समस्यांना दूर करण्यास मदत करते.

2. दह्याचे सेवन करणे :

शरीरामधील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात दह्याचे सेवन करणे अतिशय गरजेचे आहे. दररोज दही खाल्ल्याने तुमच्या शरीरामधील अनेक समस्या दूर निघून जातील. दहीमध्ये असणारे गुळ बॅक्टेरिया पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर अनेक आजारांपासून (Disease) वाचवतात.

Zinc Deficiency
Vitamin C Side Effects : जास्त प्रमाणात 'जीवनसत्त्व क' चे सेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक !

3. अंडी खा :

अंड्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर अंड अनेक पोषक तत्वांपासून भरलेले असते. तुम्ही अंड्याचे नियमित सेवन करून शरीरामधील झिंकची कमतरता पूर्ण करू शकता.

4. खाण्यामध्ये लसणाचा (Garlic) समावेश करा :

लसणात भरपूर प्रमाणात झिंक उपलब्ध असते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयन यांसारखे पोषक तत्वे असतात. तुमच्या शरीरामधील झिंकची कमतरता करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर तुम्ही जेवणामध्येदेखील दररोज लसणाचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com