Vitamin P Rich Foods : व्हिटॅमिन- पीची कमतरता ठरु शकते हृदयविकार व मधुमेहांसाठी घातक, 'या' पदार्थांचे वेळीच करा सेवन !

व्हिटॅमिन पी देखील इतर व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन ई प्रमाणे गरजेचे आहे.
Vitamin P Rich Foods
Vitamin P Rich FoodsSaam Tv

Vitamin P Rich Foods : आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिनस खूप गरजेचे असतात. व्हिटॅमिन पी देखील इतर व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन ई प्रमाणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन पी शरीराला गंभीर आजार होण्यापासून वाचवते.

त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विविध वस्तूंचा समावेश करून व्हिटॅमिन पी मिळवू शकता. फ्लेव्होनॉइड्स म्हणून सुद्धा व्हिटॅमिन पी ला ओळखले जाते. ते नैसर्गिकरित्या फळे आणि भाज्या, चहा, कोक या पदार्थांमध्ये आढळणारे रंगद्रव्य आहे.

Vitamin P Rich Foods
Vitamin C Side Effects : जास्त प्रमाणात 'जीवनसत्त्व क' चे सेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक !

फ्लेव्होनॉइड्स काही पदर्थाना त्यांचा रंग देण्याचे कार्य करते आणि संसर्गापासून त्यांचे रक्षण करतात आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

व्हिटॅमिन (Vitamins) पीच्या कमी मुळे अनेक गंभीर समस्या होण्याची शक्यता आहे. या पदार्थांमधून व्हिटॅमिन पीच्या कमतरता पूर्ण करता येईल अशे पदार्थ खाल्ल्याने त्याचा नक्कीच आरोग्याला फायदा होईल. चला तर व्हिटॅमिन पी बद्दल जाणून घेऊया

1. व्हिटॅमिन पी म्हणजे काय?

व्हिटॅमिन पीलाच फ्लेव्होनॉइड्स बायफ्लेव्हनॉइड्स असे म्हणतात. त्याचे सहा उपवर्ग आहेत. NIH त्यांच्या अहवालानुसार 6000 पेक्षा जास्त प्रकारचे flavonoids आहेत.याचा शोध १९३० मध्ये लागला तेव्हापासून त्याला व्हिटॅमिन पी असे नाव देण्यात आले आहे. परंतु हे नाव यापुढे वापरले जात नाही कारण फ्लेव्होनॉइड्स हे जीवनसत्वे नाहीत.

Vitamin P
Vitamin PCanva

2. व्हिटॅमिन पी कमी होण्याचे लक्षणे

व्हिटॅमिन सी सारखे बायफ्लेव्हनॉइड्स असते.याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे लगेच जखम होणे आणि रक्तस्त्राव होतो. तसेच संधिवातच्या संबंधित जळजळ सुद्धा होऊ शकते.व्हिटॅमिन पी शरीरातून खूप कमी प्रमाण झाल्याने हिरड्या आणि दातांच्या समस्या, त्वचा (Skin) आणि केस (Hair) कोरडे पडते, अशक्तपणा येतो.

Vitamin P Rich Foods
Vitamin-C Foods : 'क' जीवनसत्त्वांची कमतरता जाणवतेय ? आहारात आजच सामील करा 'हे' 5 पदार्थ

3. व्हिटॅमिन – पी चे मुख्य स्त्रोत

बेरी,कांदे,काळे,द्राक्ष,टोमॅटो,चहा,कोक,सफरचंद,द्राक्ष,सोयाबीन,सोया उत्पादने,क्रानबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी ,ब्लॅकबेरी,ऑलिव्ह ऑइल इत्यादी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन पी भरपूर प्रमाणात असते. फळे (Fruit) आणि भाज्यांचा रंग गडद होण्यासाठी व्हिटॅमिन -पी जबाबदार आहे.

A. स्मरणशक्ती मजबूत होते

फ्लेव्होनॉइड्स मेंदूच्या पेशीचे संरक्षण करू शकतात सोबतच मानवी मेंदूचे कार्य सुद्धा वाढू शकतात. असे एनसीबीआय यांनी एका अहवालामध्ये सांगितले आहे. मानवी स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी फ्लेव्होनॉइड्सयुक्त पदार्थ मदत करू शकते.

Vitamins P
Vitamins PCanva

B. मधुमेह टाईप २ चा धोका कमी होतो

फ्लेव्होनॉइड्ससह पदार्थ खाल्ल्याने टाईप २ मधुमेह धोका कमी होतो. असे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालात आढळून आले आहे. रोज ३०० मिलीग्राम फ्लेव्होनॉइड्सचे सेवन केल्याने ५% मधुमेहचा (Diabetes) धोका कमी होतो.

C. हृदयविकार टाळण्यासाठी

अँथोसायनिडिन्स, प्रोअँथोसायनिडिन, फ्लेव्होन, फ्लेव्होनोन आणि फ्लॅव्हन-3-ओल हे काही फ्लेव्होनॉइड्स चे वर्ग आहे याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com