Chronic Pain : अचानक पाठ-मान दुखते? खाण्यापिण्यात साधे बदल केल्यास होईल फायदा

Home remedies For Chronic Pain : झोपेतून पटकन उठल्यानंतर आपली कंबर, पाठ किंवा मान धरते व ती प्रचंड प्रमाणात दुखू लागते.
Chronic Pain
Chronic PainSaam Tv
Published On

Back-Neck Pain : झोपेतून उठल्यानंतर किंवा उठता-बसता आपल्या हाडांचा आवाज येतो. झोपेतून पटकन उठल्यानंतर आपली कंबर, पाठ किंवा मान धरते व ती प्रचंड प्रमाणात दुखू लागते. यावर बरेचदा उपाय करुनही हा आजार वारंवार जडूच लागतो.

अचानक शरीराच्या भागातून येणारी तीव्र वेदना कधीतरी असाहय्य होते. ही वेदना (Pain) कधी तीव्र तर कधी सौम्य स्वरुपाची असते. या वेदनेचे प्रामुख्याने कारण हे दुखापत, शस्त्रक्रिया, जळजळ किंवा अगदी अपघातामुळे उद्भवू शकते. जो काळ आणि वयोमानानुसार वाढत आणि कमी होत राहतो. या वेदना वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे.

Chronic Pain
Back Pain Yoga : कंबरदुखीच्या समस्येपासून हैरान आहात? 'हा' योगा ठरेल फायदेशीर

तीव्र वेदनांवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते वयाबरोबर गंभीर होत जाते. तसेच, ते सामान्य वेदनांपेक्षा जास्त काळ टिकते. तीव्र वेदना ही एक प्रकारचा वेदना आहे जी स्नायूंमध्ये उद्भवते आणि नंतर खांदे, पाठ, कंबर आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. तीव्र वेदनांमुळे निद्रानाश आणि थकवा येण्याची समस्याही कायम राहते.

या 3 गोष्टींची काळजी घ्या

1. आहार

तीव्र वेदनांचा सामना करण्यासाठी आपल्याला आहाराकडे (Food) लक्ष देणे फार गरजेचे आहे. जेवणात जेवणात पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्यांचे प्रमाण तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन (Vitamin) डी असलेले पदार्थ खायला हवे.

Chronic Pain
Yoga For Abs : 6 पॅक हवे आहेत ? मग 'ही' योगासने नियमित करुन पाहा, 2 आठवड्यात मिळेल रिजल्ट !

2. योगा

डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे योगासने व व्यायाम करा. त्यामुळे या वेदनेवर काही प्रमाणात आराम मिळू शकतो. तसेच हाडे मजबूत होतात. खांदा, कंबर याशिवाय स्नायूंच्या दुखण्यावरही योगा फायदेशीर ठरु शकतो.

3. मसाज

मोहरी, ऑलिव्ह आणि नारळाच्या तेलाने मसाज केल्याने देखील दीर्घकालीन वेदनांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि स्नायू मजबूत होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com