Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Jaw cancer treatment: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन तंत्राने जबड्याची पुनर्रचना करता येते. या शस्त्रक्रियेमुळे चेहऱ्याचा आकार सुधारण्यास आणि खाणं, बोलणं व गिळण्याची क्षमता परत मिळवण्यास मदत होऊ शकते. उपचार आणि बरे होण्याचा कालावधी रुग्णानुसार बदलतो.
Jaw reconstruction surgery
Jaw reconstruction surgerysaam tv
Published On: 

जबड्यातील कॅन्सरची गाठ काढून रुग्णाचे प्राण वाचवणं महत्त्वाचं असतं. मात्र शस्त्रक्रियेनंतर जबड्याचा काढलेला भाग पुन्हा तयार करणंही तितकेच महत्त्वाचं आहे. यामुळे रुग्णाला पुन्हा अन्न चावणं, बोलणं आणि चेहऱ्याचा आकार पूर्ववत करण्यास मदत होते.

मुंबईतील एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलमधील डोके व मान कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अमित चक्रवर्ती यांनी सांगितलं की, तोंडाचा किंवा जबड्याचा कॅन्सर वाढलेल्या अवस्थेत असेल तर गाठीसोबत जबड्याच्या हाडाचा काही भागही काढावा लागू शकतो. कॅन्सर पूर्णपणे काढण्यासाठी हे आवश्यक असत. मात्र त्यामुळे चेहऱ्याच्या आकारात मोठा बदल होऊ शकतो. आता आधुनिक शस्त्रक्रियेच्या मदतीने जबड्याचा काढलेला भाग पुन्हा तयार करणं शक्य झालंय. यामुळे रुग्णांना दैनंदिन कामं पुन्हा करता येतात.

Jaw reconstruction surgery
Children's Health: शाळा सुरू होताच मुलांच्या आरोग्याचा धोका वाढला; तज्ज्ञांनी पालकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

जबड्याची पुनर्रचना का करावी लागते?

कॅन्सरची गाठ जबड्याच्या हाडापर्यंत पोहोचल्यास ती पूर्णपणे काढण्यासाठी डॉक्टरांना हाडाचा बाधित भाग काढावा लागू शकतो. यामुळे रुग्णाला अन्न चावणं, गिळणं आणि बोलणं यामध्ये अडचणी येऊ शकतात. तसंच चेहऱ्याच्या आकारातही बदल होऊ शकतो.

जबड्याची पुनर्रचना म्हणजे केवळ चेहऱ्याचा आकार पूर्ववत करणे नाही. अन्न खाणं, बोलणं आणि गिळणं यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी जबडा आवश्यक असतो. त्यामुळे जबड्याचा काढलेला भाग पुन्हा तयार केला जातो. रुग्णाला शक्य तितकं सामान्य जीवन जगता यावं हा या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो.

जबड्याचा काढलेला भाग पुन्हा कसा तयार करतात?

खालच्या जबड्याचा मोठा भाग काढावा लागल्यास, डॉक्टर 'फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन' या शस्त्रक्रिया पद्धतीचा वापर करू शकतात. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या शरीराच्या दुसऱ्या भागातून उदाहरणार्थ पायातून, हाडाचा काही भाग घेतला जातो. त्यासोबत त्या भागातील रक्तवाहिन्याही घेतल्या जातात. गरजेनुसार त्वचा किंवा स्नायूंचाही काही भाग घेतला जाऊ शकतो.

डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितलं की, यानंतर रुग्णाच्या जबड्याच्या आकारानुसार या हाडाला योग्य आकार दिला जातो. सूक्ष्म शस्त्रक्रियेच्या मदतीने या हाडाच्या रक्तवाहिन्या मानेतील रक्तवाहिन्यांशी जोडल्या जातात. यामुळे नव्याने बसवलेल्या हाडाला रक्तपुरवठा सुरू राहतो आणि जबड्याचा काढलेला भाग पुन्हा तयार करण्यास मदत होते.

Jaw reconstruction surgery
Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

रुग्णाला पुन्हा व्यवस्थित खाणं आणि बोलणं शक्य होतं का?

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण किती लवकर बरा होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. कॅन्सर किती वाढलाय, जबड्याचा किती भाग काढावा लागला आहे, रुग्णाची प्रकृती कशी आहे आणि रेडिएशनसारख्या पुढील उपचारांची गरज आहे का, यानुसार बरं होण्याचा कालावधी ठरतो. काही रुग्णांना दात पुन्हा बसवण्यासाठी उपचार घ्यावे लागू शकतात. तसंच फिजिओथेरपी आणि बोलण्याचा व गिळण्याचा सराव करण्यासाठी विशेष उपचारांचीही गरज भासू शकते.

कॅन्सरची शस्त्रक्रिया करतानाच जबड्याची पुनर्रचना कशी करायची याचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अन्न खाणं, बोलणं आणि दात बसवून घेणं शक्य व्हावं याचा विचार डॉक्टरांना आधीपासून करावा लागतो. त्यानुसार जबड्याचा किती भाग काढायचा आणि तो पुन्हा कसा तयार करायचा, हे ठरवलं जातं.

डोके आणि मानेच्या शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे जबड्याच्या कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. कॅन्सर पूर्णपणे काढून टाकणं हे डॉक्टरांचं पहिलं उद्दिष्ट असतं. त्याचबरोबर जबड्याची पुनर्रचना केल्यामुळे रुग्णांना पुन्हा खाणं, बोलणं आणि आत्मविश्वासाने दैनंदिन जीवन जगणं शक्य होण्यास मदत मिळते. यामुळे रुग्णांचं जीवनमान सुधारण्यासही हातभार लागतो.

Jaw reconstruction surgery
Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com