दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, करंजी, शंकरपाळी, नानकट असे सर्वच पदार्थ गोड असतात. या सर्व फराळाची चव गोड असते. आता गोड खाऊन खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यांना अजिबात गोडं खावं असं वाटत नाही. त्यामुळेच आज आम्ही खास तुमच्यासाठी एक युनीक आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आणली आहे. गोड शंकरपाळी तुम्ही सर्व खातच असाल मात्र आज आपण तिखट शंकरपाळी कशी बनवतात त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
मैदा - २ वाटी
लाल तिखट - अर्धा चमचा
मीठ - चविनुसार
जिरे - १ चमचा
ओवा - १ चमचा
बेकींग सोडा - अगदी चिमुटभर
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा चाळून घ्या. त्यानंतर यामध्ये लाल तिखट मिक्स करा. पुढे त्यात चविनुसार मीठ सुद्धा मिक्स करा. मीठ मिक्स केल्यानंतर जिरे आणि ओवा तसेच बेकींग सोडा सुद्धा मिक्स करा. त्यानंतर या पीठाची छान कणीक मळून घ्या. पीठ मळून झालं की एका वाटीत काढून ठेवा.
तयार पीठ किमान अर्धा तास तरी तसंच ठेवा. त्यानंतर या पिठाच्या मस्त पोळ्या लाटून घ्या. पोळ्या अगदी जास्त पातळ आणि जास्त जाड नको. पोळी लाटली की शंकरपाळीच्या आकारात सुरीने सर्व कट करून घ्या. त्यानंतर तेल छान गरम करून घ्या. गरम तेलात शंकरपाळी मस्त तळून घ्या.
तिखट शंकरपाळी मंद आंचेवर तळायची नसते. ही शंकरपाळी कुरकुरीत व्हावी यासाठी फास्ट गॅसवरच तळायची असते. शंकरपाळी तळून झाली की एका टिशू पेपरवर काढून ठेवा. त्यामुळे यातील जास्तीचं तेल निघून जातं. अशा पद्धतीने तुम्ही तिखट शंकरपाळी बनवू शकता. ही शंकरपाळी चवीला अगदी टेस्टी लागते. शिवाय तुम्ही चहासोबत किंवा नुसती देखील खाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.