Tirupati Travel Package : IRCTC कडून स्पेशल टूर पॅकेज ! असे घेता येईल तिरुपती मंदिराचे दर्शन

Vacation Mode : मार्च महिन्यात फिरायला जाण्याचा प्लान करताय ? IRCTC कडून मिळतेय तिरुपतीचे टूर पॅकेज !
Tirupati Travel Package
Tirupati Travel PackageSaam Tv
Published On

Tirupati Travel Package : जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर स्थित आहे. असे म्हटले जाते की, तिरुपती मंदिर भगवान विष्णूला अर्पित आहे.

लोकांचा असा विश्वास आहे की, भक्तांनी मनापासून परमेश्वराची प्रार्थना केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होतात. त्यामुळे अनेक लोकांची तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असते. जर तुमचीही तिरुपती बालाजी दर्शनाची इच्छा असेल तर IRCTC च्या खास टूर (Tour) पॅकेजचा लाभ तुम्ही घेऊ शकता. चला तर मग जाणून या खास टूर पॅकेजसंबधित माहिती जाणून घेऊया.

Tirupati Travel Package
Taj Mahal Travel Tips : ताजमहलच्या सौंदर्यांने पर्यटकांच्या डोळे दिपले, अनेकांना पडतेय भूरळ !

1. पॅकेजसंबधित तपशील

  • टूर पॅकेजचे नाव - Dekho Apna Desh Tirupati Balaji Darshan with Mahabalipuram & Kanchipuram

  • पॅकेज कालावधी – 6 रात्र आणि 7 दिवस

  • ट्रॅव्हल मोड – ट्रेन

  • डेस्टिनेशन कव्हर – महाबलीपुरम, कांचीपुरम, श्रीकालहस्ती

2. मिळणाऱ्या सुविधा

  • राहण्यासाठी हॉटेलसचे (Hotel) व्यवस्थापन

  • सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हॉटेलमध्ये उपलब्ध होईल आणि ट्रेनमध्ये नाश्ता, लंच, डिनर मिळणार आहे.

  • तेथील स्थळांना भेट देण्यासाठी AC बसची सुविधा असेल

  • ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही उपलब्ध आहे.

Tirupati Travel Package
Summer Vacation Trip : उन्हाळ्याच्या सुट्टीत गारवा अनुभवायचा आहे ? मेघालयातील 'या' नयनरम्य पर्यटन स्थळांना भेट द्या !

3. आकारले जाणारे शुल्लक

  • या ट्रीपचा (Trip) लाभ घेण्यासाठी जर केवळ एक व्यक्ती असेल तर त्यांना २६,७८५ रुपये मोजावे लागतील.

  • ट्रीपसाठी जर दोन व्यक्ती असतील तर त्यांना प्रति व्यक्ती 21,490 रुपये शुल्लक भरावे लागेल.

  • लोकांना या ट्रीपचा आनंद घेण्यासाठी प्रति व्यक्ती 20,545 रुपये शुल्लक भरावे लागेल.

  • मुलांसाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागेल. तसेच बेड सोबत 18,650 रुपये आणि बेडशिवाय 15,865 रुपये भरावे लागणार.

4. अशाप्रकारे तुम्ही बुकिंग करू शकता

IRCTC खास टूर पॅकेजचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करावे लागेल. याशिवाय, तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येऊ शकते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com