Summer Vacation Trip : उन्हाळ्याच्या सुट्टीत गारवा अनुभवायचा आहे ? मेघालयातील 'या' नयनरम्य पर्यटन स्थळांना भेट द्या !

Meghalaya Travel : निसर्ग प्रेमींना फिरण्यासाठी मेघालय हे एक उत्तम ठिकाण आहे.
Summer Vacation Trip
Summer Vacation TripSaam Tv

Summer Vacation Trip : भारतातील सुंदर राज्यांपैकी मेघालय एक आहे. मेघालय हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील हिरव्या दऱ्या, धबधबे , जंगलातून वाहणाऱ्या जंगली नद्या, आणि निसर्गाचे अलौकिक दृश्य सोबतच सुंदर चेरी ब्लॉसमचे जंगल दूरवर पसरले आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमींना फिरण्यासाठी मेघालय हे एक उत्तम ठिकाण आहे.

येथील अनेक गोष्टी एक्सप्लोर करण्यासासारख्या आहेत. एकदा का इथे आलात की, पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा होईल. त्यामुळे तुम्ही जर मार्च-एप्रिलमध्ये कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर मेघालय हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला मेघालयातील अशा चार ठिकाणांबद्दल सांगणार जेथे गेल्याने तुम्ही निसर्गाच्या (Nature) सौंदर्यात हरवून जाऊ शकता.

Summer Vacation Trip
Taj Mahal Travel Tips : ताजमहलच्या सौंदर्यांने पर्यटकांच्या डोळे दिपले, अनेकांना पडतेय भूरळ !

1. मॉफलांग

मॉफलांग या ठिकाणी पोहचण्यास तुम्हाला शिलाँगपासून २५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. मॉफलांग हे ठिकाण निसर्ग प्रेमींना आवडले असे ठिकाण आहे. येथे हिरवीगार डोंगर आणि शेतीने वेढलेलं गाव आहे. या गावातील दृश्य पाहण्यासारखे आहे. या ठिकाणचे मनमोहक वातावरण मनाला भुरळ घालणारे आहे. त्यासोबतच या ठिकाणची वेगळी संस्कृती तुम्हाला अनुभवायला मिळेल.

2. एलिफंट फॉल्स

मेघालयातील एलिफंट फॉल्स हा धबधबा पाहण्यासारखा आहे. मेघालय येथील एलिफंट फॉल्स हा मुख्य धबधबा आहे. पर्यटकांना (Travel) आकर्षित करणारा हा धबधबा उंच पठारावरून दुधाच्या प्रवाहासारखा खाली कोसळतो. याठिकाणी 1897 मध्ये आलेल्या भूकंपामुळे नुकसान झाले आहे. मात्र तरीही दरवर्षी या ठिकाणी लाखो लोक फिरण्यासाठी येतात.

Summer Vacation Trip
Honeymoon Travel Place : हनीमूनसाठी बेस्ट ठरतील महाराष्ट्रातील 'ही' 5 पर्यटनस्थळे, जाणून घ्या

3. चेरापुंजी

मेघालयातील चेरापुंजी हे लोकप्रिय ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे चेरापुंजी हे ठिकाण आहे. या ठिकाणचे हवामान आणि सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. येथील चारही बाजूनी गर्द हिरवी झाडे ,उंच डोंगर रांगा आणि त्यातून अहोरात्र कोसळणारे धबधबे, शुद्ध हवा आणि ढगाळ वातावरण त्यासोबतच अतिशय साधी माणसे येथे आहेत.

4. मौसिनराम

मेघालयातील मौसिनराम हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग पेक्षा कमी नाही. भारतातच नाहीतर जगभरात सर्वात जास्त पाऊस (Rain) मौसिनराम या ठिकाणी पडतो त्यामुळे मेघालयातील पावसाचा आनंद घेण्यासाठी मौसिनराम नक्की भेट द्या. इथला हिरवागार निसर्ग बघण्यासारखा आहे. हे ठिकाण प्रत्येक ऋतूमध्ये अप्रतिम दिसते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com