Soul weight experiment :आत्म्याचं वजन मोजण्यासाठी शास्त्रज्ञाचा धोकादायक प्रयोग; संशोधनातून हादरवणारी गोष्ट समोर

Humans for soul weight: आतापर्यंत तुम्ही आत्मा किंवा इतर गोष्टींबाबत ऐकलं असेल. मात्र तुम्हाला आत्म्याचं वजन किती असतं याबाबत माहिती आहे का? यावर एका शास्त्रज्ञाने संशोधन देखील केलं आहे.
Soul weight experiment
Soul weight experimentsaam tv
Published On

मेडिकल सायन्सने खूप प्रगती केली आहे. यामध्ये शास्त्रज्ञ विविध पद्धतीचे काही ना काही प्रयोग करत असतात. शास्त्रज्ञ अधिकतर पशुपक्ष्यांवर किंवा मृतदेहांवर संशोधन करत सतात. मात्र अमेरिकेमध्ये एक असं संशोधन झालं आहे, ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी आत्म्याचं वजन किती असतं यावर संशोधन केलं आहे.

या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी मृत्यूच्या दारात असलेल्या लोकांवर संशोधन केलं. ज्यामध्ये त्यांना आत्म्याचं वजन मोजायचं होतं. यावेळी तज्ज्ञांना लोकांच्या वजनात बदल दिसून आला. ज्यामुळे शास्त्रज्ञांना समजलं की, खरंच आत्मा असतो की नाही.

Soul weight experiment
हार्ट अटॅक येण्यापूर्वी डोळ्यांमध्ये दिसणारे बदल वेळीच ओळखा

शास्त्रज्ञांनी कोणावर केले प्रयोग?

अमेरिकेतली एका शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मॅकडोगलने १९०७ मध्ये आत्म्याचं वजन मोजण्यासाठी मृत व्यक्तींवर प्रयोग केला. या प्रयोगावर काम करताना त्यांनी अशा व्यक्तींच्या शरीराचं वजन मोजून घेतलं ज्यांचा थोड्याच वेळात मृत्यू होणार आहे. ज्यामुळे त्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर तातडीने पुन्हा एकदा त्याचं वजन केलं जाईल. यामुळे खरंच त्या व्यक्तीच्या वजनात फरक पडला आहे का हे लक्षात येईल. जेणेकरून त्यांना आत्म्याचं वजन समजू शकेल.

मृत्यूनंतर किती कमी झालं वजन?

डॉक्टर मॅकडोगल यांनी माहिती घेतली तेव्हा पहिल्या रूग्णांचं मृत्यूनंतर २१ ग्रॅमने वजन कमी झालं होतं. तर दुसऱ्या एका रूग्णाचं वजनही मृत्यूनंतर काही प्रमाणात कमी झालं होतं. मात्र याच रूग्णाचं थोड्या वेळाने वजन पहिल्यासारखं मोजलं गेलं.

Soul weight experiment
Heavy periods and cancer: पिरीयड्सचा Blood Flow ठरतो कॅन्सरचं कारण; किती प्रमाणात रक्तस्राव असतो नॉर्मल?

हा प्रयोग आणखी दोन व्यक्तींवर करण्यात आला तेव्हा मृत्यूनंतर त्यांच्याही वजन कमी दिसून आली. मात्र थोड्या वेळानंतर त्या दोघांचंही वजन पूर्वी पेक्षा वाढलं होतं. याशिवाय अजून एका रूग्णाचं मृत्यूनंतर २८ ग्रॅमने वजन कमी झालं.

Soul weight experiment
Vastu tips: 'या' दिवशी तुम्हीही कपडे धुत असाल तर व्हाल कंगाल! वास्तू शास्त्राचा नियम काय सांगतो?

कोणत्या कारणामुळे झालं वजन कमी?

शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाच्या आधारावर सांगितलं की, मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल पाहायला मिळाले. त्यामुळे मृत्यूनंतर शरीराचं वजनही कमी झालं. जसं की ब्लड क्लॉटिंग, फुफ्फुसांमधून अखेरचा श्वास बाहेर पडणं, केमिकल रिएक्शन इत्यादी. मात्र जेव्हा सरकारला या प्रयोगांबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी यावर बंदी आणल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com