Surabhi Jayashree Jagdish
सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार मागे लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे हार्ट अटॅकची.
पण तुम्हाला माहितीये का, हार्ट अटॅक येण्यापूर्वी व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये खास बदल दिसून येतात.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या डोळ्याच्या रेटिनामधील ब्लड सप्लाय थांबू शकते. यामुळे समोरचं दिसेनासं होतं.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी डोळ्याच्या आयलिडजवळ पिवळ्या रंगाचा प्लाक तयार होतो. हे लक्षण दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अनेकदा अंधुक दिसत असल्याने तपासणी केल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचं पाहायला मिळतं. हे देखील हार्ट अटॅकचं लक्षण असतं.
जर तुम्हाला सतत अंधुक दिसण्याची आणि जळजळ होण्याची तक्रार जाणवते असेल तर ते हार्ट अटॅकचं लक्षण मानलं जातं.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर आहे.