राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे. रखरखत्या उन्हापासून स्वात:चा बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाया करत आहेत. घरामध्ये असताना फॅन, कुलर किंवा एसीच्या हवेने आपल्याला गरम होत नाही. मात्र बाहेर रस्त्यावर चालत असताना अंगाची लाहीलाही होते आणि अंग घामाघुम होतं. त्यामुळे रस्त्याने चालताना देखील आपल्याला गरम होऊनये यासाठी सोनी कंपनीने एक तोडफोड उपकरण बाजारात आणलं आहे.
सोनी कंपनीने त्यांच्या संशोधनातून एक चालता फिरता एसी लॉन्च केला आहे. Sony company wearable AC असं या एसीचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे हा एसी तुम्ही तुमच्या मानेवर देखील लावू शकता. त्यानंतर प्रवासात किंवा रस्त्याने जाताना, बाजारात खरेदी करताना गर्दी आणि गरमीमध्येही तुमचं शरीर थंड राहिल.
उपकरणाबाबत अधिक माहिती
कंपनीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, हे उपकरण सोनी या कंपनीने २३ एप्रिल रोजी लॉन्च केले आहे. स्मार्ट विअरेबल थर्मो डीव्हाईस कीट रिऑन पॉकेट 5 असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण तुम्ही मानेवर लावू शकता. तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रीत ठेवू शकता.
शरीर थंड ठेवण्यासाठी या उपकरणात एकूण ५ कुलींग लेव्हल देण्यात आलेत. तर गारवा रहावा यासाठी ४ वार्मिंग लेव्हल देण्यात आल्यात. उन्हाळ्यात अनेक व्यक्तींना डीहायड्रेशन, उष्माघात, भोवळ येणे अशा समस्या जानवतात. त्यामुळे सर्वांसाठीच हे उपकरण बेस्ट आहे.
फोनमधून ऑपरेट करता येणार
रिऑन पॉकेट 5 विजेवर चालते. तुम्ही एकदा चार्जिंग केल्यावर तब्बल १७ तास हे उपकरण चालतं. तुम्ही रिऑन पॉकेट 5 मानेवर लावल्यावर त्याला ऑपरेट करण्यासाठी मोबाईल फोनमध्ये संबंधित अॅप डाउनलोड करावा आणि उपकरणे चालवावे, असं कंपनीने म्हटलंय.
विक्रीसाठी उपलब्ध
रिऑन पॉकेट 5 हे उपकरण विक्रीसाठी उपलब्ध आहे. सोनी कंपनीच्या अधिकृत साईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ऑर्डर करू शकता.
किंमत किती?
रिऑन पॉकेट 5 उपकरणाची किंमत १३९ पाऊंड म्हणजेच १७० डॉलर्स इतकी आहे. कंपनीने प्रिऑर्डर बुकींग घेण्यास सुरुवात केली असून १५ मे नंतर डिलीव्हरी सुरू होणार आहे. गरमीपासून वाचण्यासाठी तुम्हीही हे उपकरण खरेदी करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.