Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्या कधी आहे ? या दिवशी 3 शुभ योग, जाणून घ्या पूजा व दान करण्याचे महत्त्व

Darsh Amavasya Tithi : या वर्षी सोमवती अमावस्येला ३ शुभ संयोग येत आहेत.
Somvati Amavasya 2023
Somvati Amavasya 2023Saam tv
Published On

Somvati Amavasya Vrat : हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्या ही सोमवारी येते म्हणून तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. यंदा ही अमावस्या १७ जुलैला आहे. हिला आषाढ अमावस्या व दर्श अमावास्या म्हणून देखील ओळखले जाते.

या अमावस्येनंतर श्रावणमास आरंभ होतो. ही अमावस्या वर्षातून दोनदा येते. या वर्षी सोमवती अमावस्येला ३ शुभ संयोग येत आहेत. ज्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्या आणि श्रावणी सोमवार या दोन्हींचे पुण्य प्राप्त होऊ शकते. या दिवशी भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा केली जाते. जाणून घेऊया याच्या पूजा, दान व इतर विधींबद्दल

Somvati Amavasya 2023
Shravni Somvar : श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जुळून आलाय शुभ योग ! या 5 राशींची होणार चांदी, हे काम करा होतील अनेक इच्छा पूर्ण

1. सोमवती अमावस्या तिथी

हिंदू पंचागानुसार (Panchang) या वर्षी कृष्ण पक्षातील आषाढ अमावस्या तिथी रविवारी 18 जुलै रात्री 10:08 पासून सुरू होत आहे तर ती 18 जुलै रोजी सकाळी 12:01 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या निमित्ताने सोमवती अमावस्या 17 जुलैला सोमवारी आहे.

2. या दिवशी काय दान कराल ?

17 जुलै रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेपासून स्नान आणि दान करू शकतात. त्या दिवशी सकाळी स्नान, दान (Donate) व पूजा करण्याचे दोन मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळी 05.34 ते 07.17 पर्यंत आहे. सोमवती अमावस्येचा दुसरा मुहूर्त सकाळी 09:01 ते 10:44 पर्यंत आहे. सोमवती अमावस्येचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:55 पर्यंत आहे.

Somvati Amavasya 2023
Shravan 2023 Rashifal : या राशींचा सुरु होणार भाग्योदय ! ५९ दिवस पडेल पैशांचा पाऊस, कामातही मिळेल यश

3. सोमवती अमावस्येला 3 शुभ संयोग

सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रावण सोमवार, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे 3 शुभ संयोग तयार होत आहेत. 17 जुलैला सोमवती अमावस्यासोबतच श्रावण (Shravan) महिना सुरु होत आहे.

दुसरीकडे, 18 जुलै रोजी सकाळी 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग आहे. पंचांगानुसार सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत तिथी सुरु होईल. अशा स्थितीत सोमवती अमावस्या 18 जुलैच्या सूर्योदयापर्यंत राहील.

Somvati Amavasya 2023
Pooja Sawant : तुच मोगरा, तुच चाफा; तुझ्या सौंदर्याचा सारा आसंमत दिवाणा

यंदा रुद्राभिषेक सोमवती अमावस्येलाही आला आहे. शंकरासोबत गौरी असल्याने सोमवती अमावस्येचा संपूर्ण दिवस रुद्राभिषेकासाठी शुभ आहे. याची तिथी ही सकाळपासून रात्री 12:01 पर्यंत आहे.

4. सोमवती अमावस्येचे महत्त्व

सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी शिव आणि गौरीचे पूजन केल्याने सुख, सौभाग्य आणि आरोग्य लाभते. सोमवती अमावस्येला पितरांना जल अर्पण केल्याने पितृदोष नाहीसा होतो. या दिवशी तुम्ही पितरांना संतुष्ट करण्यासाठी उपाय करू शकता.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com