Solo Travel : सोलो ट्रिप कारायचा विचार करताय? 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या, स्वर्गात गेल्यासारखं वाटेल

Summer Escapes: धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी काही वेळे काढून मानसिक शांतता मिळवायची आहे? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःला पुन्हा एकदा रिचार्ज करायचं आहे का? तर 'या' ठिकाणी नक्की भेट द्या.
Dehradun Adventures
सोलो ट्रिप कारायचा विचार करताय? 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या, स्वर्गात गेल्यासारखं वाटेलSaam Tv
Published On

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची खरी मज्जा तर तेव्हा येते जेव्हा तुम्ही गर्दीपासून दूर एका निवांत शांत ठिकाणी तो क्षण घालवू शकता. धकाधकीच्या जीवनातून विश्रांती घेणे, स्वतःला वेळ देणे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणे हे आपण विसरुनच गेलोय. तुम्हाला जर गर्दी पासून अगदी शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवायचा असेल, तर उत्तराखंड मधील देहरादून जिल्ह्याजवळ असलेले कलसी हे ठिकाण तुमच्यासाठी एक परिपूर्ण सोलो ट्रिप डेस्टिनेशन नक्कीच असू शकते.

या ठिकाणी तुम्ही फक्त पर्वतांच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकत नाही तर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना देखील भेट देऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी प्रमाणात असते. कलसीची खासियत, भेट देण्यासाठी तिथे असलेले ठिकाण आणि तिथे कसे पोहोचायचे ते जाणून घेऊया.

कलसीची खासियत

कलसी हे एक लहान पण अतिशय सुंदर असे हिल स्टेशन आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी त्याचबरोबर शांत वातावरणासाठी हे ठिकाण ओळखले जाते. डोंगराळ दृश्य, हिरवळ, वाहणारी यमुना नदी आणि आजूबाजूच्या गावांचा साधेपणा हे सर्व पाहून तुम्हाला आतून ताजेतवाने वाटेल. गर्दी आणि गोंगाटापासून दूर मानसिक शांतता किंवा निसर्गोपचार हवे असल्यास हे ठिकाण अगदी योग्य आहे.

Dehradun Adventures
Hill Stations: गर्मीपासून सुटका हवीय? मग नक्की भेट द्या भारतातील 'या' रम्य आणि थंड हिल स्टेशन्सना

कलसीमध्ये भेट देण्याची ठिकाणे

1. कलसी शिलालेख

ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे ठिकाण अतिशय महत्त्वाचे आहे. सम्राट अशोकाच्या काळातील ब्राह्मणी लिपीतील शिलालेख तुम्हाला येथे पाहायला मिळतील. जे सुमारे 250 इसापूर्वी काळातील आहेत. ज्यांना संस्कृतीत किंवा इतिहासात रस आहे त्यांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी.

2. यमुना नदीचे काठ

यमुना नदी ही कलसी मधून वाहते आणि तेथील काट खूप शांत आणि सुंदर आहेत. तुम्ही या ठिकाणी सकाळी फिरायला जाऊ शकता, ध्यान करू शकता किंवा एकटे बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

3. चकडा गाव आणि आजूबाजूचा परिसर

येथील सर्व गाव खूप शांत आहेत. जिथे स्थानिक जीवनशैली जवळून पाहण्याची संधी मिळते. ज्यांना चालणे, ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Dehradun Adventures
Summer Vacation Hill Stations: माथेरान सोडाच! मुंबई पुण्याजवळच्या 'या' थंडगार हिल स्टेशनला द्या भेट

4. टायगर फॉल्स

जर तुम्हाला जास्त वेळ मिळालाच तर तुम्ही टायगर फॉल्स या ठिकाणी भेट देऊ शकता. कलसी पासून अंदाजे 4,045 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हा उत्तर भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. येथील दृश्य अगदी मनमोहक असतात.

कलसीला कसे पोहोचायचे?

देहरादून पासून सुमारे 4550 किलोमीटर अंतरावर कलसी हे एक हिल स्टेशन आहे. तुम्ही जर ट्रेनने जात असाल तर तुम्हाला देहरादून या रेल्वे स्थानकावर उतरावे लागेल. त्याचे सर्वात जवळचे विमानतळ जॉली गॅंट विमानतळ आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही देहरादूनहून टॅक्सी, लोकलबस किंवा स्वतःच्या वाहनाने कलसीला पोहोचू शकता.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com