Dhanshri Shintre
उन्हाळ्यातील सुट्टी खास बनवण्यासाठी आम्ही भारतातील सात अप्रतिम हिल स्टेशन्सची यादी दिली आहे, नक्की पाहा.
उन्हाळ्यात गर्दी असूनही मनाली हे धकाधकीच्या जीवनातून आराम मिळवण्यासाठी योग्य, निसर्गाने नटलेले आकर्षक ठिकाण आहे.
हिल स्टेशनसाठी शिमला हिमाचल प्रदेश ही पहिली आणि उत्तम निवड आहे, कमी खर्चात ३-४ दिवसांत सहज पाहता येते.
मसुरी, ‘टेकड्यांची राणी’, उन्हाळ्यापासून दिलासा देणारे सुंदर ठिकाण असून या हंगामात भेट देण्यास योग्य आहे.
तामिळनाडूच्या नीलगिरी पर्वतात वसलेले उटी हे सुंदर बागा आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. जरूर भेट द्या.
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हे निसर्ग सौंदर्य आणि साहसी अनुभवांसाठी प्रसिद्ध असलेले जम्मू-काश्मीरमधील आकर्षक हिल स्टेशन आहे.
काश्मीरमधील गुलमर्ग हे निसर्गरम्य सौंदर्य आणि शांततेमुळे उन्हाळ्यात अवश्य भेट देण्याजोगे स्वर्गासारखे ठिकाण आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेले दार्जिलिंग हे शांत वातावरण आणि प्रसिद्ध चहाच्या बागांमुळे उन्हाळ्यातील उत्तम पर्यटन स्थळ आहे.