Privacy Safety And Security : सावधान! स्मार्टफोनसह स्मार्ट टीव्ही आणि स्पीकरपासून आहे तुमच्या प्रायव्हसीला धोका? सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Safety Tips : बदलत्या काळानुसार आपल्या घरातील टीव्ही देखील बदलला आहे.
Privacy Safety And Security
Privacy Safety And Security Saam Tv
Published On

How to Protect Smart TVs and Speakers From Spying : तंत्रज्ञानाच्या या युगात बरेच काही करणे सोपे झाले आहे, बदलत्या काळानुसार आपल्या घरातील टीव्ही देखील बदलला आहे. पूर्वीच्या काळात असलेले डबासारखा दिसणारा टीव्ही घरी असायचे तसेच आता ते बॉक्सऐवजी सपाट आणि सडपातळ आकारात बदलले आहे अर्थातच स्‍मार्ट टीव्ही.

आजकाल सर्वांच्या घरात स्मार्टफोन (Smartphone), स्मार्ट टीव्ही आणि स्पीकर असतात तर या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. स्मार्टफोनमुळे सुरक्षेला धोका आहे हे आपणा सर्वांना माहीतीच आहे. पण केवळ स्मार्ट फोनच नाही तर तुमचा टीव्ही आणि स्पीकरही तुमची हेरगिरी करतात. वास्तविक, जेव्हा तुम्ही कोणतेही स्मार्ट उपकरण वापरता, त्यानंतर तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट असता, तेव्हा तुमची सुरक्षा आणि प्रायव्हसी धोक्यात येते. स्मार्ट उपकरणे तुम्हाला स्मार्ट बनवण्यासोबतच धोक्यात कसे आणतात आणि तुम्ही ते कसे टाळू शकता ते पाहूयात.

Privacy Safety And Security
Car Safety: 'हा' आहे कारमधला महत्त्वाचा भाग, खराब झाल्यास होऊ शकते अधिक नुकसान!

स्मार्ट टीव्ही आणि स्पीकर वापरणे जितके मजेदार आणि सोपे वाटते तितकेच ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. हेरगिरी करून ते आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टी किंवा इतर माहिती मिळवू शकतात. हे कसे टाळता येईल ते जाणून घेऊया.

स्मार्ट टीव्हीच्या आतमध्ये कॅमेरा (Camera) आणि मायक्रोफोन या फीचर्सने तुमचा आवाज आणि चेहरा ओळखण्यासाठी वापरला जातो. हॅकर्स सहजपणे त्यात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे तुमची हेरगिरी केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे तुमचा स्मार्ट फोन आणि स्पीकर देखील तुमची हेरगिरी करण्यात यशस्वी होतात.

Privacy Safety And Security
Women Safety: गर्दीत चुकीचा स्पर्श करणाऱ्या नराधमांना मिळणार शिक्षा; 'या' जॅकेटमुळे हात लावताच लागणार करंट

स्मार्ट टीव्ही हे सेटिंग बंद करून सुरक्षित रहा

स्मार्ट टीव्हीमध्ये ऑटोमेटिक कंटेंट रिकग्निशन (एसीआर) फीचर आहे, ज्यांचे काम सर्व व्हिडिओंचे निरीक्षण करणे आहे. तुमचा डेटा (Data) वापरणाऱ्या मार्केटिंग कंपन्यांकडून त्याचा वापर केला जातो. हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या टीव्हीमध्ये सिंक प्लस आणि मार्केटिंग पर्याय अनेबल करू शकता. तुम्हाला तुमच्या टीव्हीच्या स्मार्ट हब पॉलिसीवर हा पर्याय मिळेल.

आता तुम्ही विचार करत असाल की स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट फोन ठीक आहेत पण स्पीकरचा कसा काय संबंध येतो, स्पीकरने तुमची हेरगिरी कशी केली जाते पाहूयात.

Privacy Safety And Security
Smart Tv : One Plus Tv मिळतोय अवघ्या 10,000 किमतीत, 'या' ग्राहकांना विशेष सूट

किती स्मार्ट स्पीकर तुमची हेरगिरी करतात

अहवालानुसार, ऑक्टोबर 2017 मध्ये, Google ने कन्फर्म केले, की त्याच्या Google Home Mini सारख्या छोट्या स्मार्ट स्पीकरमध्ये वापरकर्त्यांच्या परवानगी शिवाय त्यांचे संभाषण रेकॉर्ड करत आहे. हे सॉफ्टवेअर कंपनीने अपडेटसह (Update) बगचे निषेध केले असले तरी, ते Google Home Mini आणि यासारख्या इतर स्मार्ट स्पीकरच्या प्राव्हसीला धोका पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नाही.

Google Home आणि इतर स्मार्ट स्पीकर तुमची संभाषणे नेहमी ऐकत असतात. ते सक्रियपणे "हॉटवर्ड्स" किंवा "वेक वर्ड्स" जसे की "OK Google", "Hey Google", "Hey Alexa" समाविष्ट करतात. हे वेक शब्द उपकरणासाठी ट्रिगर म्हणून कार्य करतात.

Privacy Safety And Security
Smart Tips: टूथपेस्टने हटवा मोबाईल स्क्रीनवरचे स्क्रॅचेस; पण 'ही' काळजीही घ्या...

गरज नसताना तुमच्या स्पीकर्सचे मायक्रोफोन म्यूट करा. यामध्ये तुम्हाला एक फिजिकल स्विच मिळेल जो तुम्ही तुमच्या कमांडने चालू करू शकता. तुम्ही दिलेल्या कमांड किंवा आदेशाची History वेळोवेळी Delete करा. याशिवाय, two-factor authentication इनेबल करा. तुमच्या स्मार्टफोनवरून अनावश्यक उपकरणे डिस्कनेक्ट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com