Cheap Price Mobile: आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आणि दमदार फोन! किंमत फक्त ₹ 6000; तगडे फीचर्स

Infinix Smart 8 HD: स्मार्टफोन घेताना सर्वजण चांगले फिचर्स, रॅम आणि स्टोरेज आहे की नाही त्याचा विचार करतो. नुकताच एका कंपनीने ६ हजारांचा एक स्मार्टफोन लाँच केला आहे.
Budget Friendly Smartphone
Budget Friendly SmartphoneSaam Tv
Published On

Infinix Smart 8 HD Price And Specification:

स्मार्टफोन हा सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा असतो. स्मार्टफोन घेताना सर्वजण चांगले फिचर्स, रॅम आणि स्टोरेज आहे की नाही त्याचा विचार करतो. चांगले फिचर्स असलेला मोबाईल बजेटमध्ये असतोच असे नाही. परंतु आता Infinix कंपनीने अगदी ६ हजारात नवीन फिचर असलेला मोबाईल लाँच केला आहे.

कंपनीने Infinix Smart 8 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये आधुनिक फिचर्स देण्यात आल आहेत. बजेट फ्रेंडली आणि उत्तम क्वालिटीच्या या फोनबद्दल जाणून घेऊया.

फीचर्स

या नवीन स्मार्टफोनमध्ये रिफ्रेश रेट स्क्रीन, स्टँडर्ड प्रोसेसर, मॅजिक रिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे फिचर्स आहेत. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोन सिंगल कॉन्फिगरेशन 3GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. स्मार्टफोनमध्ये पिल शेप मॅजिक रिंग फिचर देण्यात आले आहे. हे फिचर अॅनिमेशन आणि नोटिफिकेशन दाखवते. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Budget Friendly Smartphone
LPG Gas Cylinder Insurance : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गॅस सिलिंडरवर मिळणार ६ लाखांचा विमा, दुर्घटनेनंतर मिळणार नुकसान भरपाई

किंमत

कंपनीने या स्मार्टफोनला फक्त 3GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या स्मार्टफोनची किंमत ५,६६९ रुपये आहे. अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरुन Infinix Smart 8 HD स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला १० टक्के सूट मिळेल.

हा स्मार्टफोन क्रिस्टल ग्रीन, सायन गोल्ड आणि टिंबर ब्लॅक कलरमध्ये येतो. हा स्मार्टफोन Android 13 (Go Edition) वर आधारित XOS 13 वर काम करतो. यात 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Budget Friendly Smartphone
Aadhar-Voter ID Link: आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंकसंदर्भात मोठी अपडेट, शेवटची तारीख कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com