Smartphone Tricks : तुमच्या मोबाईलचा डेटा लगेच संपतो ? 'या' 4 टिप्स फॉलो करा, दिवसभर वापराल !

लहान-मोठी कामे फोनद्वारेच पूर्ण होतात. महामारीनंतर स्मार्टफोन हाच एक आधार बनला आहे.
Smartphone Tricks
Smartphone TricksSaam Tv
Published On

Smartphone Tricks : हल्ली मोबाईल फोन व त्यामध्ये असणाऱ्या नेटची सुविधा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लहान-मोठी कामे फोनद्वारेच पूर्ण होतात. महामारीनंतर स्मार्टफोन हाच एक आधार बनला आहे. मग ते ऑनलाइन शॉपिंग असो, ऑनलाइन पेमेंट असो किंवा ऑनलाइन क्लास असो. सर्व काही केवळ फोनद्वारे केले जात आहे. यासाठी मोबाईल डेटा सर्वात महत्वाचा आहे.

ज्यांच्या घरात वाय-फाय आहे, त्यांना कसलेही टेन्शन नसते. मात्र मोबाईल डेटावर अवलंबून असणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. असे अनेक डेटा प्लॅन आहेत जे दररोज 3GB डेटा ऑफर (Offer) करतात. परंतु, जास्त वापरामुळे हे देखील दिवसभर टिकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्या स्मार्ट पद्धतीने तुम्ही दिवसभर डेटाचा वापर करु शकता.

Smartphone Tricks
Smart Tips: टूथपेस्टने हटवा मोबाईल स्क्रीनवरचे स्क्रॅचेस; पण 'ही' काळजीही घ्या...

दिवसभर डेटा कसा चालवायचा? डेटा दिवसभर चालेल आणि काम पूर्ण व्हावे म्हणून काय करावे? आम्ही तुम्हाला अशाच 4 युक्त्या सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दिवसभर डेटा चालवू शकता. यामुळे तुम्हाला डेटा पुन्हा पुन्हा रिचार्ज करावा लागणार नाही आणि सर्व कामेही होतील.

डेटा मर्यादा सेट करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला डेटा वापराच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Data Limit आणि Billing Cycle वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही डेटा सेट करू शकता. जसे आपण 1GB केले तर 1GB संपल्यानंतर इंटरनेट बंद होईल.

मोबाईल डेटा चालवताना मागे अनेक अॅप्स असतात, जे स्वतःला अपडेट करत असतात. सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदलले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला ऑटो अपडेट अॅप्स ओव्हर वायफाय ओन्ली सिलेक्ट करावे लागतील. असे केल्याने तुमच्या फोनचे अॅप्स फक्त वाय-फाय वर अपडेट होतील.

डेटा सेव्हर मोड देखील एक उत्तम पर्याय आहे. डेटाचा वापर कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.

Smartphone Tricks
Mobile Password : पासवर्ड न टाकता मोबाईल अनलॉक करायचा? फॉलो करा 'या' ट्रिप्स

मोबाईल (Mobile) डेटा वापरत असताना, जे अॅप्स जास्त डेटा वापरतात त्यांचा वापर कमी करा. जसे की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहणे अधिक डेटा वापरते. तसेच, ज्या अॅप्समध्ये जास्त जाहिराती दाखवल्या जातात त्या अॅप्सपासून दूर राहा. तो तुमचा डेटा खात असतो. जर तुम्ही हे अॅप्स वापरणे बंद केले तर डेटा वाया जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com