आजच्या काळात तरुणांमध्ये गोष्टी विसरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे आजकाल लोक कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून असतात. तंत्रज्ञान हे आपल्या विचार करण्याच्या, शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या पद्धती कशा बदलत आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.आपण खरोखरच कमी वयात गोष्टी विसरू लागलो आहोत की माहिती लक्षात ठेवण्याची आपली पद्धत बदलली आहे?
आपण अशा युगात जगत आहोत जिथे जवळपास प्रत्येक गोष्ट डिजिटल स्वरूपात सेव्ह करून ठेवता येते. आपण आता मेसेजचे स्क्रीनशॉट काढतो,लेख बुकमार्क करतो, सोशल मीडिया पोस्ट सेव्ह करतो आणि स्मार्टफोनमध्ये नोट्स बनवून ठेवतो. आपल्याला वाटते की आपण या गोष्टी नंतर परत पाहू. पण आपण खऱ्या अर्थाने तसे करतो का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, या गोळा केलेल्या माहितीपैकी नेमके किती आपल्याला खरोखर लक्षात राहते? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास स्मरणशक्तीची सुरुवात ही लक्ष केंद्रित करण्यापासून होते. कोणतीही माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी आधी त्यावर लक्ष देणे,ती समजून घेणे आणि नंतर मेंदूत साठवणे गरजेचे असते. सतत येणारे नोटिफिकेशन्स, एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय आणि न थांबता सोशल मीडिया स्क्रोल करणे या प्रक्रियेमुळे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
डिजिटल ऑफलोडिंग म्हणजे काय?
डिजिटल ऑफलोडिंग म्हणजे माहिती लक्षात ठेवण्यासाठी मोबाईल आणि डिजिटल नोट्स यांसारख्या गोष्टींवर अवलंबून राहणे. ही सुविधा खूप फायदेशीर ठरते, परंतु त्यावर अतिअवलंबून राहिल्यामुळे स्वतःहून माहिती लक्षात ठेवण्याचा सराव कमी होतो. एखादी गोष्ट सेव्ह करणे म्हणजे ती शिकणे नव्हे आणि वाचणे म्हणजे ती लक्षात राहणे नाही. तरीही, तंत्रज्ञान स्वतःमध्ये हानिकारक नाही. डिजिटल रिमाइंडर, कॅलेंडर आणि नोट्स आपल्याला नक्कीच मदत करू शकतात. गरज आहे ती फक्त याचा वापर आपली मानसिक क्षमता सुधारण्यासाठी करण्याची, ना की पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहण्याची.
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
माहिती सक्रियपणे लक्षात ठेवण्याचा सराव करा.
कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाचन करा.
शिकलेल्या गोष्टी स्वतःच्या शब्दांत पुन्हा आठवा , चर्चा करा आणि पुरेशी झोप घ्या.
आपला मेंदू डिजिटल उपकरणांपासून काही वेळ दूर ठेवून स्वतःला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी वेळ द्या.
टीप: यामध्ये दिलेली माहिती विविध स्रोतांवर आधारित असून ती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.