Social Media Impact on Sleep : सोशल मीडियामुळे झोपेवर होतोय गंभीर परिणाम; संशोधनातून मोठा खुलासा

Sleeping Problems Solutions : सोशल मीडिया आणि फोन तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम करत आहे, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आलीये.
Sleeping Problems Solutions
Social Media Impact on SleepSaam TV
Published On

सध्याच्या युगात अगदी लहान मुलं, वृध्द आणि तरुण मंडळी सर्वांकडे मोबाईल फोन आहे. मोबाईल फोनचा वापर जास्तप्रमाणात वाढला आहे. हातात फोन घेलतल्याबरोबर व्यक्ती फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. हाच सोशल मीडिया आणि फोन तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम करत आहे, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आलीये.

Sleeping Problems Solutions
Sleeping Problem : रात्री उशीरा झोपल्याने आरोग्याला होतात दुष्परिणाम

जर्नल ऑफ एडोलसेंट हेल्थ या जर्नलमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को येथील प्राध्यापक जेसन नगाटा यांनी आपल्या अभ्यासातून सातत फोन वापरल्याने झोप आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम सांगितला आहे. त्यांनी यात म्हटलं आहे की, अनेक व्यक्ती झोपताना फोन सायलेंट करून ठेवतात. मात्र त्यापेक्षाही तुम्ही फोन तुमच्या बेडरूममधून बाहेर ठेवला पाहिजे. कारण फोनमुळे मानसिक आरोग्य बिघडते शिवाय पुरेशी झोप होत नाही.

अनेक व्यक्ती झोप न लागणे किंवा झोप पूर्ण न होण्याच्या तक्रारी करतात. त्यामुळे प्राध्यापक जेसन नगाटा यांनी यावर काही उपाय आणि टिप्स सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेले उपाय काय आहेत ते पाहू.

सर्व मनोरंजनाची संसाधने बेडरूम बाहेर ठेवा

झोपताना आपल्या बेडरूममध्ये टीव्ही किंवा फोन ठेवू नका. झोपताना टीव्ही किंवा फोन पाहण्याची सवय वाईट आहे. त्याने डोळ्यावर ताण येतो आणि झोप लागत नाही. तसेच फोन सायलेंटवर असला तरी देखील त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे झोप मोड होत राहते.

फोन बंद करा

जर तुम्हाला बेडरूममध्ये फोन ठेवून झोपण्याची सवय असेल तर दोन बंद करा. फोन सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर ठेवल्याने झोप लागत नाही. अनेकदा गाड झोपेत असताना अचान फोन येतो, कुणाचा मॅसेज येतो तेव्हा आवाजाने किंवा फोन व्हायब्रेट झाल्याने आपली झोप मोड होते.

झोपण्याआधी फोन किंवा टीव्ही पाहू नका

टीव्ही आणि फोनमध्ये असलेले लाईटस् आणि रेडिएशन आपल्या डोळ्यांसाठी घातक असतात. झोपण्याआधी इंटरनेट वापरणे, चॅटिंग करणे, व्हिडिओ गेम खेळणे या सवयी बंद केल्या पाहिजेत.

2028 ते 2021 या कालावधीत डेटा जमा करून हा अभ्यासात करण्यात आला आहे. तरुण तसेच अन्य वयोगटातील व्यक्तींना झोपेच्या बऱ्याच समस्या आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. यामुळे मेंदूचा विकास देखील होत नाही, असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

Sleeping Problems Solutions
Sleep Problems : रात्रभर झोप लागत नाही; सावधान! तुम्हालाही होऊ शकतो 'हा' जिवघेणा आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com