Sleep Talking Disorder : तुम्हालाही रात्री झोपेत बडबडायची सवय आहे? असू शकतो हा आजार, जाणून घ्या

Causes Of Sleep Talking Disorder : झोपेत बडबणे तुम्हाला तुमच्या शारिरीक आणि मानसिक स्थितीबद्दलची जाणीव करून देते.
Sleep Talking Disorder
Sleep Talking DisorderSaam Tv
Published On

How To Control Talking In Sleep :

तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात ज्यांना झोपेत बडबडण्याची सवय आहे? तर तुम्हाला स्वतःबद्दल थोडा अधिक विचार करणे आवश्यक आहे. याचे कारण तुमच्या आरोग्याशी जोडलेले आहे. हे तुम्हाला तुमच्या शारिरीक आणि मानसिक स्थितीबद्दलची जाणीव करून देते. याशिवाय झोपेत बोलण्याची समस्या तुम्हाला भविष्यात कोणत्या आजारांना (Disease) बळी पडू शकते याचे संकेत देते. असे का होते आणि कसे होते? जाणून घ्या आजाराबद्दल सर्व काही.

स्लीप टॉकिंग डिसऑर्डर म्हणजे काय?

झोपेत बोलण्याच्या विकाराला पॅरासोमनिया म्हणतात. ही अशी अवस्था आहे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे मन आणि शरीर (Body) यांच्यात असंतुलित स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत ती व्यक्ती सुमारे 30 सेकंद काहीतरी बडबडते आणि नंतर झोपते. आणि तसेच पुन्हा नंतर उठते आणि बडबडते. तुमच्यासोबत राहणाऱ्यांना वाटेल की तुम्ही स्वप्न पाहत आहात, पण विज्ञान याला गंभीर स्थितीशी जोडते.

लोक रात्री झोपेत का बडबडतात?

वैज्ञानिक भाषेत, हे REM स्लीप (Sleep) बिहेवियर डिसऑर्डर आणि स्लीप टेरर्स या दोन प्रकारच्या झोपेच्या विकारांशी जोडलेले आहे. असे लोक झोपेतही ओरडू लागतात. RBD असलेले लोक अनेकदा हिंसक होऊ शकतात आणि हे अनेक कारणांमुळे जोडलेले असू शकते.

जसे की,

  • काही औषधांमुळे

  • नैराश्याच्या रुग्णांमध्ये

  • दिवसभर थकवा आणि तणावामुळे

  • भावनिक तणाव असलेल्या लोकांमध्ये

  • जेव्हा ताप किंवा आजार

  • जेव्हा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

Sleep Talking Disorder
Sleeping Problems Affect Diabetes | रात्रीचे जागरण करताय? तुम्हालाही जडू शकतो मधुमेहाचा आजार

ही स्थिती कशी नियंत्रित करावी

तुम्ही झोपेतही बडबडत असाल तर आधी काही गोष्टी करा. प्रथम ध्यान करावे. दुसरे म्हणजे, रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 तास आधी करावे. मोबाईलपासून दूर राहा. यावेळी झोपेच्या आधी काही वेळ शांत राहून ध्यान करावे. जर तुम्हाला खूप वेळ झोप येत नसेल किंवा तुम्हाला रात्री भीती वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता जो तुम्हाला योग्य उपचार सांगेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com