Beaches Near Mumbai : गोव्याहून सुंदर मुंबईपासून जवळ असलेले निळेभोर समुद्रकिनारे; निसर्गाचं सौंदर्यपाहून मन आनंदी होईल

Mumbai Tourist Places Beach : समुद्रकिनारे फिरताना मुंबईमधील गिरगाव, जुहू आणि दादर या चौपाट्यांमधील पाणी जास्त स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती येथे फिरणे टाळतात.
Mumbai Tourist Places Beach
Beaches Near MumbaiSaam TV

सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. अशा रखरखत्या उन्हात बाहेर फिरण्यासाठी प्रत्येक व्यक्ती थंड हवेचं ठिकाण शोधत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्ती समुद्रकिनाऱ्यांना देखील भेट देतात. समुद्रकिनारे फिरताना मुंबईमधील गिरगाव, जुहू आणि दादर या चौपाट्यांमधील पाणी जास्त स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती येथे फिरणे टाळतात.

Mumbai Tourist Places Beach
Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात कणकवलीचा युवक बुडाला, अन्य रुग्णालयात दाखल

उन्हाळ्याच्या दिवसात काही व्यक्ती गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर देखील फिरण्याचा प्लान करतात. आता तुम्हाला देखील गोव्याच्या समुद्रकिनारी फिरायचे असेल मात्र तुम्हाला तेथे जाण्यासाठी फार वेळ मिळत नसेल तर मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या या स्वच्छ आणि निळेभोर असलेल्या समुद्रकिनारी नक्की भेट द्या.

काशीद समुद्रकिनारा

मुंबईजवळील सर्वात लोकप्रिय आणि मोहक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे काशीद समुद्रकिनारा. सुट्ट्यांमध्ये अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. हा समुद्रकिनारा अतिशय पांढरा स्वच्छ आणि अगदी आकाशाप्रमाणे निळा आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या अलिबाग मुरूड रोडवरून जाताना हा समुद्रकिनारा लागतो.

मानोरी समुद्रकिनारा

उत्तर मुंबईतील धारावीच्या आसपासच्या ठिकाणी मानोरी म्हणून एक छोटेसे गाव आहे. येथे असलेल्या किनाऱ्याला मनोरी खाडी देखील म्हणतात. मात्र अन्य खाडीच्या तुलनेत ही खाडी पर्यटनासाठी खास आहे. मुंबईपासून 48 किमी अंतरावर मानोरी समुद्रकिनारा आहे.

गणपतीपुळे बीच

मुंबईपासून फक्त ३३३ किलोमिटर अंतरावर गणपतीपुळे समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा देखील प्रचंड शांत आणि स्वच्छ आहे. सुट्टीच्या दिवशी वन डे ट्रिपसाठी तुम्ही येथे फिरण्यासाठी येऊ शकता.

Mumbai Tourist Places Beach
Fishermen Arrest On Murud Beach : मुरुड किनारपट्टीवर ३७ मच्छिमारांना अटक; मोठं कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com