Itchy skin: पुरळ कुठेच नाहीये, पण संपूर्ण शरीरावर खाज येतेय? काय असू शकतात कारणं

Itchy skin causes: त्वचेला खाज येणे ही साधी समस्या असली तरी, आजार गंभीर असू शकतात.
Itchy skin causes
Itchy skin causesyandex
Published On

अंगावर खाज येणे ही समस्या साहजिक आहे. जसे की, डास चावल्यावर आपल्याला खाज येते. त्याचसोबत जास्त धुळीत गेल्यावर आपल्या शरीरावर खाज येते. मात्र काही वेळेस खास सुटण्याचे प्रमाण वाढते तेव्हा आपण कुठल्यातरी मोठ्या समस्येला सामोरे जात आहोत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. या समस्येचे कारण अगदी साधे सुद्धा असु शकते, मात्र आजार हा मोठा गंभीर होवू शकतो. तुम्हाला जर जास्त प्रमाणात शरीराला खास सुटत असेल तर तुम्हाला पुढील आजार होवू शकतात.

खाद्यपदार्थांमुळे अंगावर खाज येते.

आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्या शिवाय शेती होत नाही. त्यामुळे जी पिके तयार होतात त्यावर जंतुनाशके असु शकतात. त्याच पिकांचे आपण जेवण तयार करतो. त्यामुळे घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे, डाळी, तांदुळ हे स्वच्छ धुवून वापरावे.

रोजच्या जेवणामुळे त्रास होतोय?

तुम्ही अंडी, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी हे पदार्थ खात असाल तर, तुमच्या अंगाला खास सुटू शकते. त्यात फास्ट फुड, कुरकुरे, चिप्स, पॅकेटमधील खाऊ या पदार्थांचा सुद्धा समावेश होतो.

तुम्ही हॉटेमध्ये जेवता का?

तुम्ही जर हॉटेलमध्ये वारंवार जावून जेवत असाल तर, त्या जेवणात अजिनोमोटो नावाचा पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा पदार्थ आपल्या शरीरात गेल्याने आपल्या अंगाला खाज येते. पुरळ येवू येते. त्याचसोबत हॉटेलच्या जेवणात स्वच्छ पाण्याचा वापर नसल्याने सुद्धा अंगाला खाज सुटू शकते.

विविध वस्तुंचा वापर

तुम्ही एखाद्या व्यक्तींने वापरलेल्या वस्तु वापरल्यात तर तुमच्या अंगाला खाज सुटू शकते. त्यात अगंठी, साबण, दागिने, टिकल्या यांसारख्या अनेक वस्तुंचा समावेश त्यात होतो.

गोळ्या-औषधे

काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या- औषधांचे सेवन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसतो. त्याने पुरळ, खाज, पोटाचे त्रास अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

त्वचेचे विकार

त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते. तसेच खरुज नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, डोक्यात कोंडा या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वच्छता राखणे, बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे योग्य आहे.

Written By: Sakshi Jadhav

Itchy skin causes
Winter Health Tips: थंडीची चाहूल लागलीय; अशी घ्या काळजी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com