Skin Care Tips : ओठांच्या वरचा भाग काळवडला आहे ? तर 'या' घरगुती उपायांचा वापर करा

प्रत्येक स्त्रीला तिचे सौंदर्य जपायचे असते.
Skin Care Tips, Lips Care
Skin Care Tips, Lips CareSaam Tv
Published On

Skin Care Tips : प्रत्येक स्त्रीला तिचे सौंदर्य जपायचे असते. नैसर्गिरित्या किंवा महागड्या पदार्थांचा वापर करुन त्या चेहऱ्यासाठी काहींना काही वापरत असतात.

प्रत्येक स्त्रीला तिचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी असावेत असे वाटते. अनेक स्त्रियांच्या वरच्या ओठांचा रंग खालच्या ओठाच्या रंगापेक्षा गडद असतो. यासाठी ते अनेक प्रकारची उत्पादने विकत घेतात आणि इंटरनेटच्या मदतीने त्याचा वापर करतात.

Skin Care Tips, Lips Care
लिपस्टिकच्या या शेड्स मॅच होतील चेहऱ्याच्या प्रत्येक रंगाला!

काही महिलांच्या वरच्या ओठांचा रंग खालच्या ओठाच्या रंगापेक्षा गडद असतो.पण काही महागडी उत्पादने आपल्या ओठांना सुट होतील की, नाही हे आपल्याला माहित नसते व त्याचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेला (Skin) होतो. (Lips Care In Marathi)

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण घरातल्या काही उत्पादनांचा वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी साखर (Sugar) आणि मध उपयुक्त ठरेल.

Skin Care Tips, Lips Care
Skin Care Tips : तेलकट त्वचेवर मेकअप करताना या चुका अजिबात करु नका

साखर आणि मध यांचे फायदे

१. मध त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

२. मधामध्ये भरपूर अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

३. मधामध्ये असलेले हे गुणधर्म ओठांचा काळेपणा कमी करण्यास मदत करतात.

४. साखर ओठांवर स्क्रब म्हणून काम करते. यासोबतच साखर एक्सफोलिएशनमध्येही खूप उपयुक्त ठरते.

कसे वापराल ?

Lips Care
Lips CareCanva

प्रथम साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. यानंतर पिठीसाखरेत थोडे मध टाका. हे मिश्रण चांगले मिक्स करा व रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर चांगले लावा. कमीतकमी १० मिनिटे ते ओठांवर ठेवा.यानंतर, कापसाच्या मदतीने ओठ पूर्णपणे स्वच्छ करा. हा घरगुती उपाय रोज केल्याने फरक जाणवेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com