Young Looking Tips : वयाच्या चाळीशीतही दिसाल २५ वर्षांचे; आठवड्यातून दोनदा प्या 'हे' ड्रिंक

Skin Care Tips: वयाची पस्तीशी ओलांडल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, मुरूमे तसेच पिंग्मेटेंशन यासांरख्या समस्या उद्भवतात. तुमचं तारूण्यपण कायम टिकवून ठेवायचे असल्यास तुम्ही स्वयंपाकघरातील पदार्थाचा वापर करू शकता
Skin Care Tips
Young Looking TipsSaam Tv

वाढत्या वयाबरोबर त्वचेचं सौंदर्य देखील कमी होते. चेहरा (Skin) तरूण दिसावा यासाठी महिला विविध उपाय करतात. वय वाढले की महिलांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र तुम्हालाही तुमचं तारूण्य कायम टिकवून ठेवायचे असल्यास तुम्ही स्वयंपाकघरातील पदार्थाचा वापर करू शकता. (Latest News Marathi)

Skin Care Tips
Arranged Marriage Tips : अरेंज-मॅरेज करताना पार्टनरला चुकूनही 'या' गोष्टी सांगू नका; नात्यात दूरावा येईल

वयाची पस्तीशी ओलांडल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, मुरूमे तसेच पिंग्मेटेंशन यासांरख्या समस्या उद्भवतात.यावर उपाय म्हणून महिला विविध केमिकलयुक्त प्रसाधने वापरतात ज्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा जास्त खराब होते. नैसर्गिकरित्या चेहऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात दररोज शिजवला जाणाऱ्या तांदळाचा उपाय सांगणार आहोत.

तांदळाच्या पाण्यामध्ये अनेक पोषणतत्वे असतात जे तुमच्या चेहऱ्याला दिर्घकाळ तारूण्य ठेवण्यास मदत करते. स्वंयपाकघरात दररोज शिजवला जाणारा भात आरोग्यासाठी गुणकारी आहे. तांदळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फिनोलिक असते. तांदूळ शिजवताना त्यातून निघणारे पाणी त्वचेला लावल्याने त्वचेचं सौंदर्य खुलते.

तांदळाच्या पाण्याचे फायदे

1) तांदळाच्या पाण्यात पोषक तत्वे असतात जे प्यायल्याने शरीरात ऊर्जा राहते

2) तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील काळवटपणी कमी होण्यास मदत होते.

3) तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्याने दिर्घकाळ तारूण्यपण राहते

4) तांदळाच्या पाण्यात मीठ घालून प्यायल्याने डिहायड्रेशनपासून आराम मिळतो.

5) तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेच्या पेशींना पोषण मिळते तसेच मुरूम, डाग देखील कमी होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com